लोकमत इम्पॅक्ट... वारकऱ्यांच्या वाहनांना स्टीकर वाटप, टोलमुक्त प्रवास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 08:49 PM2022-07-08T20:49:34+5:302022-07-08T20:51:57+5:30

लोकमतने दिलेल्या वृत्तानंतर आता सावळेश्वर टोल नाक्यावरुन पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांचे टोल आकारले जाणार नाहीत

Lokmat Impact ... Distribution of stickers to Warkaris' vehicles, toll free travel in Solapur | लोकमत इम्पॅक्ट... वारकऱ्यांच्या वाहनांना स्टीकर वाटप, टोलमुक्त प्रवास सुरू

लोकमत इम्पॅक्ट... वारकऱ्यांच्या वाहनांना स्टीकर वाटप, टोलमुक्त प्रवास सुरू

Next

सोलापूर - पंढरपूर यात्रेला जाणाऱ्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या वाहनाला पथकरातून सूट मिळण्यासाठी परिवहन विभागाकडून स्टिकर्स किंवा पास घेणे आवश्यक असून त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून संबंधित पोलीस स्टेशन येथे सुविधा करण्यात आली आहे. सोलापूर-पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांकडन वारकऱ्यांशी उद्धट वर्तन केले जात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. मात्र, या घोषणेची अंमलबजावणी होत नसल्याची बातमी सर्वप्रथम लोकमतने दिली होती. याची दखल घेत आता सोलापूर जिल्हाधिकारी यांनी यंत्रणा कामाला लावली आहे. त्यामुळे, वारकऱ्यांची वाहने या दौऱ्यात आता टोलपासून मुक्त होत आहेत. 

लोकमतने दिलेल्या वृत्तानंतर आता सावळेश्वर टोल नाक्यावरुन पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांचे टोल आकारले जाणार नाहीत, याबाबतचा अध्यादेशाच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढला आहे. त्यासाठी, वारकऱ्यांना तसे स्टीकर संबंधित पोलीस स्टेशनमधून घेऊन गाडीवर लावणे आवश्यक आहे. त्यानुसार वाहतूक पोलीस प्रशासन आणि टोल कर्मचाऱ्यांकडूनही अंबलजावणी होत आहे. सावळेश्वर टोल नाक्यावर कर्मचारीही नेमण्यात आले असून वाहनधारक वारकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. 

पंढरपूरला जाताना आणि येताना १५ जुलै २०२२ पर्यंत या कालावधीत पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनासाठी ही सुविधा असेल. संबंधितांनी वाहन क्रमांक, चालकाचे नावासह अर्ज करून पास प्राप्त करून घ्यावा, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी कळविले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची घोषणा केली होती. वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोलमध्ये सुट देण्याची घोषणा झाल्यानंतर त्याचे प्रत्यक्ष पासेस मिळणे सुरू झाले आहे.

लोकमतने दिलेले वृत्त

Pandharpur Wari: कोण मुख्यमंत्री?... आधी टोलचे पैसे द्या; टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याचा वारकऱ्यांशी उद्धटपणा


 

Web Title: Lokmat Impact ... Distribution of stickers to Warkaris' vehicles, toll free travel in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.