लोकमत इनिशिएटिव्ह ; सोलापुरातील महिला सांगू लागल्यात, ‘झोपडपट्टीतील कचरा घंटागाडीत.. मात्र दुकानदारांचा कचरा रस्त्यावर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 03:48 PM2018-12-20T15:48:52+5:302018-12-20T15:51:40+5:30

‘लोकमत’च्या चळवळीत सखींचा पुढाकार : ‘स्वच्छ सोलापूर’ला डाग लावणारे ‘कचराफेकू’ व्यावसायिक रडारवर

Lokmat Initiative; In Solapur, the women were told to 'slum garbage in the garbage shop .. but only on shopkeepers' waste street' | लोकमत इनिशिएटिव्ह ; सोलापुरातील महिला सांगू लागल्यात, ‘झोपडपट्टीतील कचरा घंटागाडीत.. मात्र दुकानदारांचा कचरा रस्त्यावर’

लोकमत इनिशिएटिव्ह ; सोलापुरातील महिला सांगू लागल्यात, ‘झोपडपट्टीतील कचरा घंटागाडीत.. मात्र दुकानदारांचा कचरा रस्त्यावर’

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापूर ‘लोकमत’नं सोलापुरातील स्मार्ट सखींना आवाहन करताच अनेक जणी मोठ्या उत्साहानं पुढं सरसावल्यातशहरातील कचरा संकलनासाठी महापालिकेच्या घंटागाड्या नियमितपणे फिरत आहेत.

सोलापूर : ‘लोकमत’नं सोलापुरातील स्मार्ट सखींना आवाहन करताच अनेक जणी मोठ्या उत्साहानं पुढं सरसावल्यात. ‘यापुढे आपल्या परिसरात रस्त्यावर कचरा दिसल्यास फोटो काढून पाठवू,’ असं मोठ्या आत्मविश्वासानं सांगू लागल्यात.  विशेष म्हणजे या महिलांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवलं की झोपडपट्टीतील कचरा थेट घंटा गाडीत जातोय; मात्र बहुतांश हातगाडीवाले अन् दुकानदारच आपला कचरा रस्त्यावर टाकताहेत.

शहरातील कचरा संकलनासाठी महापालिकेच्या घंटागाड्या नियमितपणे फिरत आहेत. मनपा उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी पेठांमध्ये घंटागाड्यांच्या दोन फेºया होतात. नागरी वसाहतींप्रमाणे व्यापारी पेठांमधील कचरा कोंडाळी हटविण्यात आली आहेत. लोकांनी उघड्यावर कचरा न टाकता घंटागाडीत टाकावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. पण अनेक दुकानदार उघड्यावर कचरा टाकत आहेत. 

गोरगरीब माणसाला राहायला नीट जागा नसते. तरीही तो कचरा साठवून घंटागाडीत टाकण्याची सवय लावून घेत आहे. त्यांची मानसिकता बदलत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र व्यापाºयांना ही सवय लावून घ्यायला काय अडचण आहे. घंटागाडीत कचरा टाकण्याची सवय लावून घ्या, स्मार्ट सिटी अभियानात योगदान द्या, असे आवाहन त्यांनी  केले.


महापालिकेचे सफाई कर्मचारी अशा व्यापाºयांवर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई होणार असल्याचे संकेतही दिले. 

चायनीज गाड्या, फेरीवालेही रडारवर
- शहरातील चायनीज गाडीवाले, फेरीवाले या मंडळींचा मोठ्या प्रमाणावर कचरा संकलित होतो. ही मंडळी शिल्लक मांस, अन्न आदी प्रकारचा कचरा उघड्यावर टाकतात. त्यातून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव होतो. ही कुत्री हिंस्त्र होऊन पुन्हा लहान मुले, महिलांवर हल्ले करतात. हत्तुरे वस्ती, आसरा चौक, गुरुनानक चौक, स्टेशन रोड, अशोक चौक परिसर, देगाव रोड, भारती विद्यापीठ परिसर, विजापूर रोड या भागातील चायनीज गाडीवाले, फळविक्रेते, फेरीवाले उघड्यावर कचरा टाकत आहेत. त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. 

तुमच्या परिसरात कचरा टाकला जातोय? 
मग काढा टाकणाºयाचा फोटो अन् पाठवा मेसेज!
- सोलापुरातील स्मार्ट महिलांच्या पुढाकारातून ज्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जाईल, त्या मोहिमेची सचित्र माहिती ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सोलापूरकरांचा अधिकाधिक सहभाग वाढावा आणि सोलापूर शहर स्मार्ट व्हावं, यासाठी लोकमतनं पुढाकार घेतलाय.. तेव्हा महिलांनी आपल्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याºयाचा लाईव्ह फोटो 9096880008 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर मेसेजद्वारे पाठवावा. चला तर मग.. उचला मोबाईल, काढा फोटो अन् पाठवा मेसेज.

Web Title: Lokmat Initiative; In Solapur, the women were told to 'slum garbage in the garbage shop .. but only on shopkeepers' waste street'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.