नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाच्या तयारीसाठी लोकनेते कारखाना सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:27 AM2021-09-08T04:27:50+5:302021-09-08T04:27:50+5:30
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाळराजे पाटील, पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील, संचालक प्रकाश चवरे, सीईओ ओमप्रकाश जोगदे, शेती अधिकारी एम. ...
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाळराजे पाटील, पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील, संचालक प्रकाश चवरे, सीईओ ओमप्रकाश जोगदे, शेती अधिकारी एम. आय. देशमुख, केमिस्ट कृष्णात वैद्य, इंजिनिअर लक्ष्मण मुखेकर, आसवनी प्रकल्प प्रमुख रावसाहेब अवताडे, राजशेखर गायकवाड आदी उपस्थित होते.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कुठल्याही भूलथापांना बळी न पडता सर्व ऊस कारखान्यास गाळपासाठी द्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
-----
कारखाना पूर्ण क्षमतेने गाळप करणार : पाटील
लोकनेते कारखान्याने कायम शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. गेल्या गळीत हंगामात कारखान्याने ५ लाख ८३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून ८ लाख ७७ हजार पोती साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा ९.९३ एवढा मिळाला होता. गेल्या हंगामातील कारखान्याची मूळ एफआरपी २,२८१ असून आजपर्यंत कारखान्याने सभासदांना २,०८१ रुपये दिले आहेत. चालू गळीत हंगामाची कारखान्याने संपूर्ण तयारी केली आहे. चेअरमन बाळराजे पाटील आणि सर्व संचालक मंडळ आणि कारखाना प्रशासन गळीत हंगामाच्या तयारीला लागले आहेत. सभासदांच्या पाठबळावर येत्या काळातील गळीत हंगाम देखील उच्चांकी गाळप क्षमतेने कारखाना पूर्ण करील असा विश्वास वाटतो, असे माजी आमदार, संस्थापक अध्यक्ष राजन पाटील यांनी स्पष्ट केले.
---
070921\fb_img_1593825296337.jpg
नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाच्या तयारीसाठी लोकनेते कारखाना सज्ज