करमाळा आगारातून लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:16 AM2021-07-11T04:16:51+5:302021-07-11T04:16:51+5:30

मात्र पुणे, मुंबईवरून परत आलेल्या प्रवाशांना करमाळ्यातून स्वतःच्या गावी जाणे गैरसोयीचे होत होते. तसेच ग्रामीण भागातील जनतेला करमाळा शहरात ...

Long distance trains start from Karmala depot | करमाळा आगारातून लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू

करमाळा आगारातून लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू

Next

मात्र पुणे, मुंबईवरून परत आलेल्या प्रवाशांना करमाळ्यातून स्वतःच्या गावी जाणे गैरसोयीचे होत होते. तसेच ग्रामीण भागातील जनतेला करमाळा शहरात येणे-जाणे सोपे व्हावे यासाठी ग्रामीण भागातील बससेवा सुरु करण्यात येत आहे. यामधील शेळगाव, आवाटी, कर्जत, जामखेड, बार्शी, चिखलठाण, केतूर या गावातील मुक्कामी बस सुरू झाल्या आहेत.

---

विविध मागण्यांसाठी तलाठी संघाचे निवेदन

मोहोळ : तलाठी संवर्गातील मंडळ अधिकारी, अव्वल कारकून व नायब तहसीलदार यांच्या विविध प्रकारच्या प्रलंबित असलेल्या ३७ मागण्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे मोहोळ तालुका तलाठी संघामार्फत ७ जुलैपासून बेमुदत रजा आंदोलन पुकारण्यात आले असून यासंबंधीचे निवेदन तहसीलदार जीवन बनसोडे यांना देण्यात आले. तलाठी संघामार्फत आतापर्यंत तीन वेळा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. यावेळी मोहोळ तालुका तलाठी संघाचे सर्व सदस्य, मंडल अधिकारी उपस्थित होते.

---

बेंबळे ग्रामपंचायतीस ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

बेंबळे : बेंबळे ग्रामपंचायतीस संदीप डरंगे यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट दिला आहे. अशाच प्रकारचा आणखीन एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर परिते प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देणार असल्याचा मनोदय संदीप डरंगे यांनी यावेळी व्यक्त केला. या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा स्वीकार सरपंच विजय पवार, ग्रामविकास अधिकारी मधुकर माने, आरोग्य सेविका कोरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमास उपसरपंच नाना भोसले, तात्यासाहेब पवार, माजी सरपंच कैलास भोसले, अशोक देवकर, अशोक काळे, बिभीषण हुलगे, दादा काळे, राजेंद्र जगताप, नामदेव कांबळे, सिद्धेश्वर शिंदे, मुकुंद रामदासी, सत्यवान भोसले आदी उपस्थित होते.

---

बार्शीत २१ ठिकाणी परिषद की पाठशाला

बार्शी : कोरोनाच्या काळामध्ये राज्यातील शाळा व महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने १ ते ८ जुलै दरम्यान वाड्यावस्त्यांवर कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून परिषद की पाठशाला हा उपक्रम घेण्यात आला. बार्शी शहरामध्ये तसेच वाड्या-वस्त्या व खेड्यांमध्ये २१ ठिकाणी हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला. यासाठी शहराध्यक्ष तात्यासाहेब घावटे, शहर मंत्री अभिषेक खाडे, सहमंत्री अभिषेक कुलकर्णी, लखन भंडारे, अथर्व कुलकर्णी, सुमित जगदाळे, लक्ष्मण वाघमारे, अशोक मुंडे आदींनी परिश्रम घेतले.

---

द्वारकाधीश मंदिर परिसरात सिमेंट बेंच

सोलापूर : द्वारकाधीश मंदिर परिसरात उपमहापौर राजेश काळे, देशमुख व द्वारकाधीश मंदिराचे मुखिया यांच्या हस्ते १२ सिमेंट बेंचचे लोकार्पण करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक दररोज मॉर्निंग वॉकला जातात व इतर सर्वांना बसण्यासाठी १२ सिमेंट बेंच बसवून देण्यात आले. या कार्यक्रमास सुनील अग्रवाल, आरती बंडी, सोहम चौधरी, वैभव हैमकर, पवन अग्रवाल, प्रमोद म्हाडेकर, श्वेता अग्रवाल, जयेस पटेल, सचिन चौधरी, दिवाणजी, शिरसट व अधिकारी उपस्थित होते.

---

चिंचोली येथे जीमचे उद्घाटन

सोलापूर : माढा तालुक्यातील चिंचोली येथे जीमची सुरुवात करण्यात आली. या जीमचे उद्घाटन माढा तालुक्यांचे सभापती विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. मिलिंद लोंढे, सोलापूर जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, महानगरपालिका उपायुक्त धनराज पांडे, राष्ट्रीय व्हॉलीबॉल पटू प्रशांत कांबळे, डॉ. विजयकुमार लोंढे, तानाजी लोंढे, महावीर आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या जीमची स्थापना करण्यात आली. यावेळी दिनेश लोंढे, डॉ. अंकुश लोंढे, डॉ. विठ्ठल लोंढे, राजाभाऊ लोंढे, सरपंच शहाजी देवकुळे, उपसरपंच मुन्ना लोंढे, अमोल लोंढे, आदी मान्यवर उपस्थित होते.

---

आषाढी वारीसाठी भाविकांची तपासणी

पंढरपूर : आषाढी वारीसाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांच्या कोरोना तपासणीसाठी नगरपरिषदेच्या वतीने पाच ठिकाणी तपासणी पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक पथकामध्ये दहा डॉक्टर व आरोग्य सेवकांचा समावेश आहे. बुधवारी दिवसभर पाचशे भाविकांची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये बारा जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. संबंधितांना ६५ एकर आणि गजानन महाराज मंदिरातील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. त्यांच्यावर त्वरित उपचार करण्यात येत आहेत.

---

वारीमुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची स्वच्छता सुरू

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या निमित्ताने येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली आहे. दररोज दिवसातून तीनवेळा मंदिरात सॅनिटायझरची फवारणी करून स्वच्छ केले जात आहे. २० जुलै रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर समितीने संपूर्ण मंदिराची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. आषाढी एकादशीच्या मुख्यमंत्र्यांच्या महापूजा वेळी उपस्थित राहणाऱ्या पदाधिकारी, अधिकारी व मंदिरातील कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी केली जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली..

---

प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेश नोंदणी सुरू

सोलापूर : दहावीनंतर शासकीय तंत्रनिकेतन प्रथम वर्ष प्रवेश २०२१-२०२२ साठी प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यात ३० जूनपासून सुरू झालेली आहे. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख २३ जुलै असून शासनाने दहावी बोर्डाचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदविका प्रवेशाचे अर्ज भरण्याची अनुमती दिलेली आहे.

त्या अनुषंगाने दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनी निकालाची वाट न पाहता दहावीचा आसन क्रमांक आणि जन्म दाखला या आधारे प्रथम वर्ष पदविका (डिप्लोमा) प्रवेशाचा अर्ज ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष सुविधा केंद्रांवर जाऊन भरावा. यासाठी सर्व मुख्याध्यापकांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना आसन क्रमांक आणि बोनाफाईड प्रमाणपत्र देण्याबाबतची विनंती पत्र प्रा. सुहास पोद्दार यांनी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी यांना दिलेले आहे.

---

पुल्ली प्रशालेत कन्यांना सायकली वाटप

सोलापूर : रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या पुढाकाराने पद्मशाली शिक्षण संस्था संचलित भू. म. पुल्ली कन्या प्रशालेतील कन्यांना ‘सायकल बँक’ योजनेतून सायकलींचे वाटप करण्यात आले. संस्थेचे देणगीदार डॉ. कौशिक शहा (पुणे), प्रशांत कोंडले (बंगळूरु), सुनील मदन, अमोल सारडा, सरोज गुलाटी, उद्योजक गोवर्धन चाटला यांच्या दातृत्वातून सहा नवीन सायकली मुलींना प्रदान करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका गीता सादूल यांनी केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष सुहास लाहोटी, सेक्रेटरी विशाल वर्मा, युथ सर्व्हिस डायरेक्टर गोवर्धन चाटला, कौशिक शहा, खजिनदार सूरज तापडिया, संस्थेचे विश्वस्त विजयकुमार गुल्लापल्ली आदी उपस्थित होते. शाळेचे उपमुख्याध्यापक युवराज मेटे यांनी आभार मानले.

---

नंदेश्वर येथे वृक्षारोपण

मंगळवेढा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जाहीर केलेल्या ‘एक पद एक वृक्ष’ उपक्रमांतर्गत नंदेश्वर येथील श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे श्री बाळकृष्ण माउली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांच्या हस्ते विविध रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य भारत बंडगर, पर्यवेक्षक रावसाहेब कांबळे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

---

श्रीपूरच्या पांडुरंग कारखान्याचा १३१ रुपयांचा दुसरा हप्ता जाहीर

अकलूज : श्रीपूर येथील श्री पांडुरंग कारखान्याने गतवर्षी गाळप केलेल्या ऊस बिलापोटी १३१ रुपयांचा दुसरा हप्ता जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. पूर्वी दिलेले २,१०० रुपये आणि आताचे १३१ असे मिळून २,२३१ रुपये या कारखान्याने गतवर्षीच्या ऊस बिलापोटी आजपर्यंत अदा केले आहेत. श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गत गळीत हंगामात गाळप केलेल्या उसास यापूर्वी पहिला हप्ता २,१०० रुपयांप्रमाणे अदा केला आहे. त्यानंतर गुरुवारी १३१ रुपये प्रति टनाप्रमाणे दुसरा हप्ता दिला आहे.

---

Web Title: Long distance trains start from Karmala depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.