बार्शीतील दुर्लक्षित वैकुंठधामचे रुपडे पालटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:36 AM2020-12-13T04:36:52+5:302020-12-13T04:36:52+5:30
दररोज सकाळी सहा ते आठ या वेळेत विविध भाव व भक्तीगीते स्पीकरवर लावून परिसरातील लोकांची सकाळ आनंददायी केली जाते़ ...
दररोज सकाळी सहा ते आठ या वेळेत विविध भाव व भक्तीगीते स्पीकरवर लावून परिसरातील लोकांची सकाळ आनंददायी केली जाते़ कार्यकर्ते दररोज तीन तास श्रमदान करतात, तसेच तुळजापूर नाका ते रेल्वे पूलपर्यंतची रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छता करून झाडे लावली आहेत़ त्यामुळे कावळे आणि चिमण्या जमू लागल्या आहेत.
स्मशानभूमीत वाढदिवस साजरे
दुर्लक्षित असलेल्या स्मशानभूमीची स्वच्छता केल्याने आता वाढदिवस साजरे होऊ लागले आहेत. आतापर्यंत सुमारे ४० जणांनी वाढदिवस साजरे केले आहेत. शिवाय सध्या २० मुले व मुलींना लाठी-काठी व मर्दानी खेळाचे दररोज प्रशिक्षण दिले जाते.
यांचे मोलाचे योगदान
या स्मूशानभूमीचे रुपडे पालटण्यासाठी अध्यक्ष तुळशीदास मस्के, उपाध्यक्ष वसंतमामा हवालदार, सचिव राणाप्रताप देशमुख, सहसचिव ॲड. अनंत मस्के, खजिनदार पवन खरसडे तसेच संतोष मस्के, संतोष पवार, राजाभाऊ नवगण, आप्पा साळुंखे, किरण लुंगारे, नाना माकरड, किशोर आकोसकर, सौदागर मुळे, दीपक पाटील, मनोज बोकरे, बाळासाहेब जाधव, दादा लोहार, दीपक शिंंदे यांचे योगदान मोलाचे ठरत आहे.
फोटो
१२बार्शी-स्मशानभूमी
बार्शीतील दुर्लक्षित स्मशानभूमीत श्रमदान करताना जाणीव फाउंडेशनचे पदाधिकारी.