आमदार झाल्यासारखं वाटतंय...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 03:14 PM2019-10-08T15:14:06+5:302019-10-08T15:14:11+5:30

विलास जळकोटकर (दहीदुधाचे माठ घेऊन निघालेल्या मावशी अन् गवळणींची लगबग सुरू आहे. गोकुळनगरी ओलांडून बाजारात प्रवेश करतानाच वेशीवरच कृष्णदेवाचा ...

Looks like an MLA ...! | आमदार झाल्यासारखं वाटतंय...!

आमदार झाल्यासारखं वाटतंय...!

Next

विलास जळकोटकर

(दहीदुधाचे माठ घेऊन निघालेल्या मावशी अन् गवळणींची लगबग सुरू आहे. गोकुळनगरी ओलांडून बाजारात प्रवेश करतानाच वेशीवरच कृष्णदेवाचा बॉडीगार्ड पेंद्या त्यांची वाट अडवतो) 
पेंद्या : थांबाऽऽ कुठं चाललाव. पुढं जाता येनार न्हाय.
मावशी : कोन हाईच रे रताळ्या...
पेंद्या : मावशे आडवंतिडवं बोलायचं काम न्हाय. न्हायतर....
मावशे: नाहीतर काय रं, कोन लागून गेलायंस तू. 
पेंद्या: आमी आमच्या राजाचे बाडीगार्ड
मावशी: मग जा की, हितं कशाला कडमडायला आलायच
पेंद्या: टोलनाक्यावर पावती फाडल्याशिवाय सोडायचं नाही, हुकम हाय.
गवळण:  (लडिवाळपणे) आता गं बया, ह्योे कसला टोल घिवून   बसलाव. बाजाराला काय आमी आताच येताव व्हय. आमची वळख न्हाय काय?
पेंद्या: हे बगा! गवळणींनो ते मला काय माहीत न्हाय. आमचा राजा इलेक्शनला उभा राह्यलाय. त्यांच्यासाठी मदतनिधी हुभा कराचाय. पावती फाडा न्हायतर बाजारात परवेश न्हाय... (मावशी वैतागते)
मावशी: अरं ये मुडद्या. लई मोठ्ठा ‘दादा’ लागून गेलाच व्हय. राजकारनातला किंगमेकर झाल्यागत वाटाय लागलंय?  
पेंद्या: (डोकं ठिकाणावर आल्यागत) मावशे काय बी बोलायचं काम नाही.
मावशी:  काय करनार रं.
पेंद्या: राज्य आमचं हाय. आमी कायबी करू.
मावशी: (ंबांगड्या सावरत) का रं लई शाना झाला व्हय. एका बुक्कीतच गार करीन. आमी बायकांनीबी बंड केल्यावर कळंल. 
पेंद्या: (बाह्या सावरत)येऽऽ मावशे बंडाची भाषा सोडून बोल. अगुदरच आमच्या राजाला बंड थंड करता करता नाकीनऊ आलंय. 
मावशी: मग आता वाट सोडतू का मारु हाळी 
पेंद्या : जाऊ दे जा बाय. कुनाला सांगू नकू आमचा राजा मला कच्चं खाईल. 
मावशी: आता कसं आला वटनीवर (मावशी पुढे आणि गवळणी पेंद्याला ठेंगा दाखवत बाजाराकडं झपझप पावले टाकत निघतात.)
गवळण: (बाजारात फुकट प्रवेश मिळाल्याने उत्साहित झालेली गवळण म्हणाली) मावशेऽऽ तुला मानलं बाई. पेंद्याला थंडच केलंस की.
मावशे: ह्यलाच राजकारन म्हनत्यात. भिलं की ते आपल्याला खिळवित्यात. मग आपुनबी त्यंला खिळविलं फायजी.   
गवळण:  मावशे! तू बी पक्की राजकारन्यासारकं बोलाय लागलीस की. 
मावशी:  मग उगं पांढरी झाल्ये व्हय गं माजे केस.आता तर इलेक्शनचा मोसम हाय. समदे  उकाळ्यापाकाळ्या काढायला टपून बसल्याती
गवळण : पन, मावशे तिकडं बार्शीत, पंडपूर-मंगुड्यात,करमाळ्यात आन् सांगूल्यात लई घासूनपुसून चाललंय म्हनं. समद्याला ‘आमदारच झाल्यासारकं वाटाय लागलंय म्हनं.
मावशे: तितलं काय सांगावं बाई. तितं काय समदा मलिदाच मलिदा   हाय. 
गवळण: म्हणून काय समदे आमदार व्हनार असत्यात व्हय.
मावशी: जाऊ दी की तुला काय कराचाय? 
गवळण: (घुश्यात येत) आता गं बया, मला आपलं वाटलं म्हनून      बोल्ले.
दुसरी गवळण: लई शानी हाईस चल निवडणुकीच्या अगुदरच  त्यनला आमदारासारकं वाटतंय तर वाटू दी की, आपल्यात भांडण कशाला चला!
मावशी: पोरीनों झालं तेवडं पुरान बास्स. चला बाजार आला बग. (बोलतच बाजाराकडे वळतात आणि नेमकं त्याचवेळी समोरुन एक टमटम भडऽऽभडऽऽभड आवाज करीत निघालेलं आतल्या साऊंडवर नेमकं ‘जवा बगतीस तू माज्याकडं, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ हेच गाणं लागलेलं ते ऐकून साºयाच फिदीफिदी हसत बाजाराकडं वळतात).

Web Title: Looks like an MLA ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.