नाटक पाहून परतताना कार आडवी लावून लूटमार
By काशिनाथ वाघमारे | Updated: April 30, 2023 19:32 IST2023-04-30T19:32:32+5:302023-04-30T19:32:48+5:30
दोघांना अटक : सोहाळेतील घटनेत सहापैकी दोघांना अटक

नाटक पाहून परतताना कार आडवी लावून लूटमार
काशिनाथ वाघमारे, सोलापूर : मोहोळ तालुक्यात सोहाळे येथे यात्रेनिमित्त आयोजित केलेले नाटक पाहून रात्री कारमधून घरी परतत असताना सोलापूर येथील सहा जणानी त्यांची कार आडवी लावून मारहाण करून खिशातील रक्कम काढून घेत लुटमार केल्याची तक्रार प्रशांत विठ्ठल जगताप (वय ३८, रा. सोहाळे) या शेतक-याने दिली आहे. कामती पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात दोघांना अटक केली आहे .
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार २८ एप्रिल रोजी सोहाळे येथे यात्रे निमित्त गावात नाटक आयोजित करण्यात आले होते. हे नाटक पाहून जगताप हे मुलांसह कार (एम. एच. १३ / डी. ई. ७३३४) मध्ये बसून शेतातील घराकडे निघाले होते. रात्री ११ वाजण्याच्या सुमरास सोहाळे गावापासून एक किमी अंतरावर येताच पाठीमागून एका कारमधून सहाजण आले. त्यांची कार आडवी लावून जगताप यांची कार थांबवली. कारमधून सहाजण खाली उतरले. जगताप यांना मारहाण करून खिशातील ४,७०० रुपये, आधारकार्ड व पॅनकार्ड असलेले पॉकेट घेवून निघून गेले. त्यानंतर जगताप यांनी कामती पोलीस ठाण्यात धाव घेतली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने हे करीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"