ऐकायला कमी येतं? श्रवणदोष - कर्णबधिरत्व यावर आज मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:41 AM2020-12-05T04:41:42+5:302020-12-05T04:41:42+5:30

दरम्यान, अशा या दुर्लक्षित व गंभीर समस्येबाबत समाजात जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने लोकमत सखी मंच व नवले स्पीच ...

Loss of hearing? Deafness - A Guide to Deafness Today | ऐकायला कमी येतं? श्रवणदोष - कर्णबधिरत्व यावर आज मार्गदर्शन

ऐकायला कमी येतं? श्रवणदोष - कर्णबधिरत्व यावर आज मार्गदर्शन

Next

दरम्यान, अशा या दुर्लक्षित व गंभीर समस्येबाबत समाजात जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने लोकमत सखी मंच व नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक यांच्या वतीने दि. ३ डिसेंबर २०२० रोजी जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून ‘‘ऐकायला कमी येतं? श्रवणदोष व कर्णबधिरत्व एक दुर्लक्षित गंभीर समस्या’’ या विषयावर फेसबुक लाईव्ह थेट संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या लाईव्ह कार्यक्रमात नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिकचे ऑडिओलॉजिस्ट व स्पीच थेरेपिस्ट रविशंकर नवले हे सखोल मार्गदर्शन करणार आहेत.

सायं. ५ वाजता लोकमत इव्हेंट्स सोलापूर-लातूर-उस्मानाबाद या फेसबुक पेजवर होणाऱ्या लाईव्ह संवाद कार्यक्रमात श्रवणदोष कर्णबधिरत्वाबद्दल असणारी सद्यस्थिती, श्रवणयंत्राचा योग्य वापर व त्याबद्दल असणारे गैरसमज, ध्वनिप्रदूषणाची कारणे व दुष्परिणाम, तपासणी व उपचारतज्ज्ञ कोण?, कोरोनानंतर श्रवणदोषांबाबत असणारी सद्यपरिस्थिती अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

बऱ्याच वेळा अशा समस्यां आपल्याशी निगडित नाहीत असे समजून अशा कार्यक्रमांना दुर्लक्ष केले जाते परंतु कोरोना नंतरची सद्य स्थिती पाहता श्रवणदोष -कर्णबधिरत्व ही एक दुर्लक्षित गंभीर समस्या बनली आहे. लहानमुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळयांनाच ह्या समस्येला सामोरे जावे लागत आहे अशा वेळी श्रवणदोष संदर्भात योग्य मार्गदर्शन लाभणे गरजेचे असते. विशेषतः श्रवणयंत्राबाबत तर अधिकच काळजी घेणे आवश्यक असते त्यामुळे या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचा लोकांना नक्कीच लाभ होईल. श्रवणदोषाविषयी काही प्रश्न किंवा शंका असल्यास ८८८८१६६३७९ या क्रमांकावर व्हाॅट्सॲप करावे व या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन लोकमतच्या वतीने करण्यात आले आहे.

फेसबुक लाईव्ह कार्यक्रमासाठी..

हा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आमच्या लोकमत इव्हेंट्स सोलापूर-लातूर-उस्मानाबाद या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा, त्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करावा https:// www.facebook.com/ teameventsol/ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नावनोंदणीकरिता खाली दिलेल्या लिंकचा वापर करून गूगल फॉर्म भरावे. https://forms.gle/q2ozLBkS3sJQ5TbL7

Web Title: Loss of hearing? Deafness - A Guide to Deafness Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.