पंढरपुरात प्रथमच कमळ फुलले; भाजपच्या समाधान आवताडेंचा ३७३३ मतांनी विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:17 AM2021-05-03T04:17:37+5:302021-05-03T04:17:37+5:30

मात्र हा वाद भाजपने शांत पद्धतीने आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर ...

Lotus blossomed for the first time in Pandharpur; BJP's Samadhan Avtade wins by 3733 votes | पंढरपुरात प्रथमच कमळ फुलले; भाजपच्या समाधान आवताडेंचा ३७३३ मतांनी विजय

पंढरपुरात प्रथमच कमळ फुलले; भाजपच्या समाधान आवताडेंचा ३७३३ मतांनी विजय

Next

मात्र हा वाद भाजपने शांत पद्धतीने आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी हाताळत मतविभागणी टाळण्यासाठी परिचारकांना दोन पावले मागे घेण्यास सांगत आवताडेंना उमेदवारी दिली व योग्य नियोजन करीत मोठ्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली.

राष्ट्रवादीत निवडणुकीअगोदर पदाधिकारी निवडीवरून सुरू असलेला गोंधळ, विठ्ठल कारखान्याची मागील काही वर्षांपासून असलेली आर्थिक बिकट अवस्था, भगीरथ भालके यांचा कमी असलेला जनसंपर्क, मागील काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांचे कट करण्यात आलेले वीज कनेक्शन, कर्जमाफी, अनुदान, विठ्ठल बळकावण्याचा भाजपकडून केलेला प्रचार यानंतर अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह इतर मंत्री, खासदार, आमदारांनी प्रचार करूनही ही जागा महाविकास आघाडीला राखण्यात अपयश आले आहे.

प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते

या निवडणुकीसाठी जवळपास १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, भाजपचे समाधान आवताडे व महाविकास आघाडीचे भगीरथ भालके या दोघांमध्येच ही लढत प्रामुख्याने झाल्याचे पाहावयास मिळाले. समाधान आवताडेंना १ लाख ९ हजार ४५० मते मिळाली, तर महाविकास आघाडीच्या भगीरथ भालके यांना १ लाख ५ हजार ७१७ मते मिळाली. त्यानंतर आवताडेंचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे हे २९५५ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले, तर शिवसेनेच्या बंडखोर नेत्या शैला गोडसे या १६०७ मते घेत चौथ्या क्रमांकावर राहिल्या. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष सचिन शिंदे यांनी बंडखोरी केली होती. त्यांनाही अवघ्या १०२७ मतांवर समाधान मानावे लागले. सेलिब्रिटी उमेदवार अभिजित बिचकुले निवडणूक रिंगणात होते. त्यांना केवळ १३७ मते मिळाली. इतर अपक्ष उमेदवारांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रथमच फुलले कमळ

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ हा मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून परिचित आहे. भाजप-शिवसेनेची युती असल्यापासून याठिकाणी भाजप-सेनेचा उमेदवार कधीही निवडून आलेला नाही. उलट राष्ट्रवादीत असताना लक्ष्मणराव ढोबळे, सुधाकरपंत परिचारक, माजी आ. लक्ष्मण साळे, कै. भारत भालके या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनीच या मतदारसंघाचे कायम प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, यावर्षी पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला शह देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मोट बांधत समाधान आवताडेंना उमेदवारी देत होणारी मतविभागणी टाळली व त्याचाच प्रचंड फायदा भाजपला झाला. यामुळे इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुलले आहे. त्यामुळे आता माढा, सोलापूरच्या खासदारकीनंतर पंढरपूरच्या आमदारकीचीही त्यामध्ये भर पडली आहे.

Web Title: Lotus blossomed for the first time in Pandharpur; BJP's Samadhan Avtade wins by 3733 votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.