तरुणीवर प्रेम, पण समोरून नकार; तरुणाने इन्स्टाग्रामवर स्वत:ला श्रद्धांजली वाहिली अन् नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 18:58 IST2024-12-18T18:57:58+5:302024-12-18T18:58:30+5:30

तरुणाने फोन करून माझे एका मुलीवर प्रेम आहे, ती मला लग्नास नकार देत असल्यामुळे आता माझी जगण्याची इच्छा संपल्याचे सांगून फोन बंद केला.

Love for a young woman but rejection from the front An extreme step taken by the youth | तरुणीवर प्रेम, पण समोरून नकार; तरुणाने इन्स्टाग्रामवर स्वत:ला श्रद्धांजली वाहिली अन् नंतर...

तरुणीवर प्रेम, पण समोरून नकार; तरुणाने इन्स्टाग्रामवर स्वत:ला श्रद्धांजली वाहिली अन् नंतर...

Sangola Crime ( Marathi News ) : प्रेमभंग झाल्याच्या नैराश्यातून जेसीबी ऑपरेटर तरुणाने इन्स्टाग्रामवर स्वतःच्या फोटोला श्रद्धांजली वाहून दोरीने पळसाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी ११:३० च्या सुमारास कटफळ (ता. सांगोला) येथील फॉरेस्टमधील पाझर तलावाजवळ उघडकीस आली. संजय भगवान केदार (वय २५, रा. लातूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.  

गार्डी येथील फाटे याच्याकडे असलेल्या जेसीबी मशीनवर संजय केदार हा ऑपरेटर (चालक) म्हणून कामास होता. दरम्यान, मंगळवारी सकाळी ११:२७ च्या सुमारास संजयने स्वतःच्या मोबाइलवरून मालक फाटे यांच्या मोबाइलवर फोन करून माझे एका मुलीवर प्रेम आहे, ती मला लग्नास नकार देत असल्यामुळे आता माझी जगण्याची इच्छा संपल्याचे सांगून त्याने फोन बंद केला. त्यानंतर संजयने त्यांच्या व्हॉट्सअॅपवर त्याचे लोकेशनही पाठविले. त्यानंतर फाटे व त्यांचा मित्रांनी मिळून संजयला शोधत त्याने पाठवलेल्या लोकेशनवर गेले. कटफळ शिवारातील दुधाळवाडी फॉरेस्टमध्ये तो वापरत असलेली दुचाकी मिळून आली. 

दोघांनी आजूबाजूला शोध घेत असता, फॉरेस्टमधील पाझर तलावाजवळ एका पळसाच्या झाडाला संजय दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी संजय यास खाली उतरून सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याचे उपचारापूर्वीच निधन झाल्याचे सांगितले.

Web Title: Love for a young woman but rejection from the front An extreme step taken by the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.