लंपीने पुन्हा डोकं वर काढले, मंगळवेढ्यात ४० गायी बाधित

By काशिनाथ वाघमारे | Published: August 19, 2023 05:27 PM2023-08-19T17:27:59+5:302023-08-19T17:29:00+5:30

पशुपालाक धास्तावले : लंपीग्रस्त ४९ हजार गायी व वासरांना लसीकरण

Lumpy reared his head again, 40 cows affected in Mangalvedha | लंपीने पुन्हा डोकं वर काढले, मंगळवेढ्यात ४० गायी बाधित

लंपीने पुन्हा डोकं वर काढले, मंगळवेढ्यात ४० गायी बाधित

googlenewsNext

काशिनाथ वाघमारे

सोलापूर : मंगळवेढा तालुक्यात लंपी आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. तालुक्यात ४० गायी या आजाराने बाधीत झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे पशुपालक चांगलेच धास्तावले आहेत.

वातावरणातील तपमान वाढत चालल्यामुळे लंपी आजार ही वाढत चालला आहे. हा आजार जून महिन्यात कमी झाला होता. परिणामी कमी आजारामुळे पशुपालकांचा जीवही भांडयात पडला होता. मात्र पुन्हा या आजाराने जोम धरल्याने जनावराच्या अंगावर बारिक गाठी उदभवत आहेत. पायांना सूज येत असल्याचे चित्र आहे.

१७ गावात ४० गायिंना बाधा

शेलेवाडी (२), डोंगरगांव (१), हिवरगांव (१), मारोळी (१), लक्ष्मी दहिवडी (२), नंदेश्वर (३), हुलजंती (२), सोड्डी (२)़ पाटखळ (२), बठाण(१), माचणूर (५), मुंढेवाडी (१), सिध्दापूर (३), अरळी (४), तामदर्डी (५), तांडोर (४), नंदूर (१) अशी गावनिहाय ४० बाधी गायींची संख्या आहे. दरम्यान मध्यंतरी लंपीग्रस्त ४९ हजार ४३४ गायीं व वासरांना लसीकरण केले होते.
---
लंपीचा वाढता प्रादुर्भाव पाहता पशुधन विभागाने गावोगावी लसीकरण शिबिर मोहीम हाती घेऊन पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
-शिवानंद पाटील
चेअरमन, दामाजी साखर कारखाना मंगळवेढा

Web Title: Lumpy reared his head again, 40 cows affected in Mangalvedha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.