मंगळवेढयात लंपीचे थैमान सुरुच; ३८५ गायींना आजाराची लागण

By काशिनाथ वाघमारे | Published: May 30, 2023 03:59 PM2023-05-30T15:59:57+5:302023-05-30T16:00:06+5:30

या सर्व गायींवर उपचार सुरु असून गेल्या वर्षभरात १९०८ जनावरे उपचारांती बरी झाली आहेत.

Lumpy's continues in Mangalvedha; 385 cows infected with the disease | मंगळवेढयात लंपीचे थैमान सुरुच; ३८५ गायींना आजाराची लागण

मंगळवेढयात लंपीचे थैमान सुरुच; ३८५ गायींना आजाराची लागण

googlenewsNext

सोलापूर : लंपी आजाराने मंगळवेढा तालुक्यात थैमान घातल्याने जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे तर दुसरीकडे पशूपालकातील चिंता वाढत चालली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा मोठया संख्येने जनावरे या आजाराला बळी पडत असल्याचे चित्र आहे. दरम्यान आत्तापर्यंत २७४ गायींना लंपीची लागण झाली असून गेल्या वर्षभरात २७० गायी या आजाराला बळी पडलेल्या आहेत.

मंगळवेढा तालुक्यात गावनिहाय लंपी आजाराने ग्रस्त असलेल्या जनावरांची संख्या पुढीलप्रमाणे :
अकोला १७, आबसेवाडी १, शेलेवाडी २, भोसे ३, माळेवाडी २, जालिहाळ १, हाजापूर ३,हिवरगांव ४, जंगलगी -१, जित्ती १, चिकलगी २, कचरेवाडी ४२, डोंगरगांव ३, हुलजंती १, खोमनाळ ६,फटेवाडी २, तळसंगी ३१, भालेवाडी ०२, मरवडे -२,मंगळवेढा-२२, हुन्नूर १,देगांव-१,घरनिकी १०, आंधळगाव २, मारापूर १४, बावची १, गुंजेगाव ३, लक्ष्मी दहिवडी -२, नंदेश्वर ४, रेवेवाडी १, सोड्डी २, शिवणगी१, शेलेवाडी ४, सलगर बु.२, सलगर खु १, शिरनांदगी- १०, मारोळी १,रड्डे -१, ब्रम्हपुरी१, धर्मगांव १, बठाण १४, मुढवी ६, उचेठाण ६, रहाटेवाडी ३, मुंढेवाडी १, सिध्दापूर ९, तांडोर २, डोणज १५, बोराळे ०२, नंदूर ५ असे एकूण २७४ जनावरांना लंपी आजाराची लागण झाली आहे.

१९०८ जणावरे झाली बरी
या सर्व गायींवर उपचार सुरु असून गेल्या वर्षभरात १९०८ जनावरे उपचारांती बरी झाली आहेत. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एम.एल.नरळे,व भास्कर पराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढयातील पशुसंवर्धन विभाग या लंपी आजारावर उपचार करीत आहे. दरम्यान लंपी आजार दिवसेंदिवस वाढत असताना येथे मात्र पशुवैदयकिय अधिकार्यांची संख्या कमी असल्याने तारेवरची कसरत करत कामकाज करावे लागत आहे. तात्काळ रिक्त जागा भरून लंपी आजारावर नियंत्रण ठेवावे अशी मागणी होत आहे.

Web Title: Lumpy's continues in Mangalvedha; 385 cows infected with the disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.