माचणूर - बेगमपुर पुलावर पाणी; सोलापूर - मंगळवेढा महामार्ग वाहतुकीसाठी बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 09:09 AM2020-10-15T09:09:28+5:302020-10-15T12:55:42+5:30

भीमेच्या रुद्रावताराने पिकांची माती; नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची तयारी सुरु

Machnur - water on Begumpur bridge; Solapur - Mangalvedha highway closed for traffic | माचणूर - बेगमपुर पुलावर पाणी; सोलापूर - मंगळवेढा महामार्ग वाहतुकीसाठी बंद 

माचणूर - बेगमपुर पुलावर पाणी; सोलापूर - मंगळवेढा महामार्ग वाहतुकीसाठी बंद 

Next

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे

अतिवृष्टीमुळे उजनी धरणातून २ लाख ५० क्यूसेस व वीर मधून २५ हजार असा मोठा पावणेतीन लाख क्यूसेस चा महाविसर्ग भीमा नदीत सोडल्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील नदीकाठच्या सात गावात महापूरपरिस्थिती निर्माण झाली आहे . तालुक्यात  ऊस लागवड व पेरणीसाठी पाऊस थांबेल यासाठी  शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला असताना नदीकाठी मात्र महापूर आला असल्याने शेतकऱ्यांला विदारक परिस्थिती चा अनुभव पाहिला मिळत आहे दरम्यान पूरपरिस्थिती वर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसीलदार स्वप्निल रावडे सकाळपासून भीमा नदीकाठच्या गावांना भेटी देऊन नागरिकांना धीर देत आहेत त्यांनी  महसुलची पथके तयार केली आहेत पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळे नदीकाठी हाहाकार उडाला असून भीमेने रौद्ररूप धारण केले आहे. तामदर्डी गावाचा संपर्क तुटला आहे

भीमा नदीकाठची मंदिरे पाण्याखाली गेली असून सोलापूर- मंगळवेढा हा महामार्ग सकाळी ९.३० वाजेपर्यंत पाण्याखाली जाणार  आहे
भीमा नदी काठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तालुका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे तालुक्यातील बठाण, उचेठाण, ब्रह्मपुरी, माचणूर, तामदर्डी, अरळी, सिद्धापूर, तांडोर, या सात गावाजवळ पुराचे पाणी पोहचले आहे भीमा नदी पात्राबाहेर पडल्याने नदी काठची हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे . तामदर्दी गावाचा संपर्क तुटला आहे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी नदीकाठच्या गावांना भेटी देऊन पूर परिस्थिती चा आढावा घेऊन नदीकाठी वस्ती करून राहणाऱ्या ना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत या मार्गावर रहाटेवाडी मार्गे गावात पाणी येत असल्याने बोराळे ते माचनूर , रहाटेवाडी ते बोराळे हा मार्ग बंद झाले आहेत

बेगमपूरच्या पूलावर पाणी येण्यासाठी अडीच ते पावणेतिन लाख क्यूसेस पाण्याचा विसर्गाची गरज आहे. सन २००६ व २००७ या साली सलग दोन वेळा महापूर आल्याने बेगमपूर पूलावर जवळपास तीन फूट पाणी होते.  सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून अजून दि १७ पर्यत  मुसळधार पावसाचा अंदाज सांगितला असल्याने  विसर्ग वाढला जाणार आहे त्यामुळे माचनूर -बेगमपूरच्या पूलावरही सकाळी ९.३० पर्यत  पाणी येण्याची शक्यता तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी वर्तवले आहे.

भिमा नदीकाठावर उचेठाण, बठाण, ब्रम्हपुरी, माचणूर, तामदर्डी, रहाटेवाडी, तांडोर, अरळी, सिध्दापूर ही गावे असून पूराचा पहिला फटका तामदर्डी गावाला बॅक वाटरमुळे बसला . तामदर्डी गावाला पाण्याने वेढल्यानंतर बेटासारखी आवस्था निर्माण झाली आहे . ही परस्थिती निर्माण होवू नये यासाठी रहाटेवाडी ते तामदर्डी दरम्यान मच्छीपुलाची गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र अद्यापही पूर्ण झाली नाही. परिणामी महापूर आल्यानंतर गावाला संकटाशी सामना करावा लागतो आहे. तामदर्डी नंतर दुसरा फटका उचेठाण गावाला ओढयातून पाणी आल्यामुळे पाण्याने गाव वेडले जाते.

गावात जाण्यायेण्यासाठी होढीचा वापर वेळप्रसंगी करावा लागतो. इतर गावे उंचावर असल्यामुळे शक्यतो या गावांना पाण्याचा फटका बसत नाही मात्र शेतीचे क्षेत्र पाण्याखाली जात असल्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकाचे मोठे आर्थिक नुकसान होते. तहसिलदार स्वप्निल रावडे यांनी   नदीकाठावरील  गावांना तलाठयांच्या समवेत भेटी देवून नागरीकांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच  तलाठी व सर्कल यांना निवाशी राहण्याच्या सुचना करण्यात आल्या. ग्रामस्थांना खबरदारी म्हणून पुराच्या वाहत्या पाण्यात प्रवेश करू नये असे आवाहन तहसिलदार रावडे यांनी केले आहे.

नदीकाठावर शेतीच्या सिंचनासाठी मोठया प्रमाणात विद्युत मोटारी बसविल्या आहेत. नदीला पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने कालपासून शेतकर्‍यांची मोटारी , पाईप  काढण्यासाठी लगबग सुरू होती. प्रशासनाकडून नदीकाठावरील शेतकर्‍यांना सावधानतेचा इशारा या पूर्वी दिल्याने मोटारी भिजून शेतकर्‍यांचे होणारेे नुकसान टळले आहे.

Web Title: Machnur - water on Begumpur bridge; Solapur - Mangalvedha highway closed for traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.