माढा : शेवटच्या दिवशी अर्जदारांची झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:22 AM2020-12-31T04:22:48+5:302020-12-31T04:22:48+5:30
माढा : तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्याा दिवशी बुधवारी अक्षरशः झुंबड उडाली. काही गावांमध्ये रांगा लावून ...
माढा : तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्याा दिवशी बुधवारी अक्षरशः झुंबड उडाली. काही गावांमध्ये रांगा लावून उमेदवारी अर्ज दाखल केले. तालुक्यातील जामगाव, सापटणे (भो.), महातपूर, वडाचीवाडी (त म), निमगाव (टे) खैराव, आदी ग्रामपंचायती बिनविरोध होणार असल्याची शक्यता आहे. या निवडणुकीत ५० टक्के युवकांना संधी मिळाली आहे.
ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात अडथळे येत असल्याने शासनाने ऑफलाईन अर्ज स्वीकारले. परिणामत: शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झाली. तहसील कार्यालय, शासकीय धान्य गोदाम व नगरपंचायत सभागृह या ठिकाणी अर्ज दाखल करण्याची सोय करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या. ७० टक्के नवीन चेहरे गाव गडाच्या राजकारणात दिसतात. २०१४ वगळता स्थापनेपासून माढा तालुक्यातील ग्रामपंचायत बिनविरोध होत राहिली. केवळ २०१५ मध्ये जामगाव ग्रामपंचायत निवडणूक लागली होती. मात्र यावर्षी ती बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
---
फोटो : ३० माढा
माढा तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक अर्ज दाखल झाले. शेवटच्या दिवशी रांगा लावून अर्ज दाखल करण्यात आले.