धैर्यशील मोहिते-पाटलांच्या विजयानंतर 'शिवरत्न' वर जल्लोष; माढा लोकसभा मतदारसंघात दिवाळी
By Appasaheb.patil | Updated: June 4, 2024 19:06 IST2024-06-04T19:05:02+5:302024-06-04T19:06:15+5:30
Madha Lok Sabha Election Result 2024 : माढा लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमदेवार धैर्यशील मोहिते-पाटील हे विजयी झाले आहेत.

धैर्यशील मोहिते-पाटलांच्या विजयानंतर 'शिवरत्न' वर जल्लोष; माढा लोकसभा मतदारसंघात दिवाळी
आप्पासाहेब पाटील,सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमदेवार धैर्यशील मोहिते-पाटील हे विजयी झाले आहेत. विजयानंतर सोलापूरसह माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला, अकलूज येथे विजयी जल्लोष सुरू आहे. जेसीबीच्या माध्यमातून गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
या आनंदात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, पत्नी नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह मोहिते-पाटील कुटुंबातील प्रत्येक सदस्य सहभागी झाला आहे. मतमोजणी परिसरातील रामवाडी परिसरातही मोहिते-पाटील समर्थकांनी विजयी जल्लोष केला. माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते-पाटील यांना करमाळ्यातून १४ हजार ५००, माढ्यातून १७ हजार ५००, सांगोल्यातून ५ हजार ६००, माळशिरसमधून ९७ हजार, माणमधून ५ हजार २०० मतांची लीड मिळाला आहे. धैर्यशील मोहिते-पाटलांना ६ लाख ३८ हजार ५०० मते मिळाली असून भाजपाचे उमदेवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना ५ लाख १४ हजार मते मिळाली आहे. धैर्यशील मोहिते-पाटील हे १ लाख ३९ हजार ८०० मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अद्याप केली नाही.