माढ्याच्या संजय शिंदे कुटुंबाची प्रचाराच्या रणधुमाळीत उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 03:54 PM2019-04-09T15:54:08+5:302019-04-09T15:55:48+5:30
माढा लोकसभा मतदारसंघातील राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण कुटुंब नव्हे तर त्यांचे अख्खे निमगाव तयारीला लागले आहे.
इरफान शेख
कुर्डूवाडी: माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण कुटुंब नव्हे तर त्यांचे अख्खे निमगाव तयारीला लागले आहे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक कुटुंब व असंख्य कार्यकर्त्यांची फौज आहे. कार्यकर्त्यांनाही प्रचारासाठी गावे वाटून दिली आहेत. प्रचार दौरे, कॉर्नर सभा, सभा आदींची माहिती गावागावांत पोहोचवायची, ग्राउंड रिपोर्ट निमगावला द्यायचा, अशी एक ना अनेक कामे ते करीत आहेत.
सकाळी उठल्यापासून त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची रांग लागलेली असते. प्रत्येकाची भेट घ्यायची गरज असल्यास त्यांना मंत्रालयात, जिल्हा परिषद, तालुका पंचायतीत बोलवायचे व त्याचे काम करायचे.
उमेदवाराचे नाव । संजय शिंदे
सुमारे २५ ते ३० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, कृउबाचे चेअरमन, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून काम.
भाऊ। आ. बबनदादा शिंदे
गेल्या २५ वर्षांपासून आमदार, जिल्हा दूध संघाचे चेअरमन होते. माढा तालुक्यातील कार्यकर्त्यांची नाळ त्यांच्याशी जोडली आहे. भावासाठी ते अख्खा तालुका व संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत.
पुतण्या । रणजितसिंह शिंदे
तुर्कपिंपरी कारखान्याचे चेअरमन, माढा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती, विद्यमान जि.प.सदस्य अशा अनेक पदांवर ते कार्यरत आहेत. तेही प्रचारासाठी संूपर्ण माढा मतदारसंघात सक्रिय आहेत.
पुतण्या । धनराज शिंदे
हे तालुका पंचायत सदस्य असून, सध्या ते पंढरपूर व सांगोला तालुक्यात चुलत्याच्या प्रचारासाठी फिरत आहेत. यांचा जनसंपर्क मोठा असून, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा मोठा वाटा.
मुलगा। यशवंत शिंदे
विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक. त्यांचे उच्च शिक्षण परदेशात झाले आहे. आपल्या वडिलांच्या प्रचारासाठी ते करमाळा मतदारसंघात अगदी वस्तीवर फिरुन प्रचार करत आहेत.