बोहल्यावर चढण्यापुर्वी दोघां सख्या भावांनी केले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 02:23 PM2019-04-23T14:23:08+5:302019-04-23T14:25:34+5:30

आधी लगीन लोकशाहीचे आणि मग लग्न स्वत : चे म्हणत लग्नाची वरात थेट मतदान केंद्राकडे वळवली

madha loksabha election voting | बोहल्यावर चढण्यापुर्वी दोघां सख्या भावांनी केले मतदान

बोहल्यावर चढण्यापुर्वी दोघां सख्या भावांनी केले मतदान

Next
ठळक मुद्दे- माढा लोकसभा मतदारसंघात मतदान सुरळीत सुरू- ‘मतदानासाठी वेळ काढा व आपली जबाबदारी पार पाडा’- मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राजकीय पक्षांची कसरत

अमर गायकवाड

माढा : माढा लोकसभा मतदार संघाच्या तिसºया टप्प्यातील मतदानासाठी शहरात मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडत असून पुरुषांबरोबर महिला मतदारही मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसून येत आहे.

माढा शहरातील अक्षय विलास चवरे व अभय विलास चवरे या दोघां सख्ख्या भावांचा विवाह मंगळवार २३ रोजी शहरातील तुळजाभवानी मंगल कार्यालयात झाला़   या दोन्ही नवरदेवांनी अगोदर लगीन लोकशाहीचे व मग लग्न स्वत:चे म्हणत लग्नाची वरात थेट मतदान केंद्राकडे वळवली व आपला मतदानाचा अधिकार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बुथ क्रमांक ७९ याठिकाणी  घोड्यावर येऊन बजावला.

या ठिकाणी ८५० मतदारांपैकी २६० मतदारांनी सकाळच्या सत्रात पार पाडली होती. व इतर युवकांना देखील मतदान करण्याविषयी आव्हान करत ‘मतदानासाठी वेळ काढा व आपली जबाबदारी पार पाडा’ व लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा असे फलक घेऊन नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान करून बाहेर आल्यानंतर उपनगराध्यक्ष प्रभाकर जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजारनाना भांगे व शहाजी नाना चवरे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सर्वपक्षीय लोकांकडून त्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.

 

Web Title: madha loksabha election voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.