माढा पंचायतीने पटकावला यशवंत पंचायत राज अभियानात पटकावला तिसरा क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:29 AM2021-02-27T04:29:21+5:302021-02-27T04:29:21+5:30
कुर्डूवाडी : यशवंत पंचायत राज अभियानात (२०२०-२१) माढा पंचायत समितीने पुणे विभागात तिसरा क्रमांक पटकावला आहे. याबाबत विभागीय आयुक्त ...
कुर्डूवाडी : यशवंत पंचायत राज अभियानात (२०२०-२१) माढा पंचायत समितीने पुणे विभागात तिसरा क्रमांक पटकावला आहे. याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने उपायुक्त (विकास) राजाराम झेंडे यांनी निवडीची घोषणा केली.
याबाबतचे पत्र येथील कार्यालयाला मिळताच पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. तसेच गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करून आनंद साजरा केला.
माढा पंचायत समितीने यशवंत पंचायत राज अभियानात सहभाग नोंदविला होता. विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्या पथकाने येथील पंचायत समितीच्या सर्व विभागांची नुकतीच तपासणी केली होती. त्यानंतर २४ फेब्रुवारी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. कोल्हापूर जिल्हा परिषदेने २६९.६४ गुण मिळवून जिल्हा परिषद विभागातून त्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. पंचायत समिती विभागातून कागल (कोल्हापूर) पंचायत समितीने २७६.७४ गुण मिळवून विभागात प्रथम क्रमांक पटकावला. दुसराही क्रमांक गडहिंग्लज (कोल्हापूर) पंचायत समितीने २७०.५४ गुण मिळवून पटकावला आहे. तिसरा क्रमांक सोलापूर जिल्ह्यातील माढा पंचायत समितीने २६१.४८ गुण मिळवून पटकाविला आहे.
या अभियानात राज्य शासनाकडून मिळालेल्या निधीचा विनीयोग , झेडपी सेस फंडाच्या योजनेतून घेण्यात येणारे उपक्रम, ग्रामीण भागातील विकास योजना, स्वच्छता, पंचायत समितीची इमारत यामुळे हा पुरस्कार पंचायत समितीला मिळाला आहे.
यासाठी सभापती विक्रमसिह शिंदे, उपसभापती धनाजी जवळगे, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, बांधकामचे उपअभियंता एस. जे. नाईकवाडी, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, पशुधन विकास अधिकारी डॉ.व्ही.एल.बागल, पाणीपुरवठा विभागाचे गफूर शेख, बालविकास प्रकल्प अधिकारी किरण सोमवंशी, विनोद लोंढे, सयाजी बागल, रमेश बोराडे, अवघडे, दादासाहेब मराठे, महेश शेंडे, माधुरी पाटील यांनी परिश्रम घेतले.
..............
फोटो : २६ माढा पंचायत समिती
यशवंत पंचायत राज अभियानात तिसरा क्रमांक पटकावताच कर्मचा-यांनी माढा पंचायत कार्यालय आवारात आनंद व्यक्त केला.