Madha Vidhan Sabha Election Result 2024 : शरद पवार गटाचं खातं उघडलं; माढ्यात अभिजीत पाटलांचा १३६५५९ मतांनी विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 02:28 PM2024-11-23T14:28:40+5:302024-11-23T15:04:13+5:30

Madha Assembly Election 2024 Result : माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजीत पाटील विजयी झाले आहेत.

Madha vidhan sabha assembly election result 2024 Abhijit Patil of NCP Sharad Pawar party wins | Madha Vidhan Sabha Election Result 2024 : शरद पवार गटाचं खातं उघडलं; माढ्यात अभिजीत पाटलांचा १३६५५९ मतांनी विजय

Madha Vidhan Sabha Election Result 2024 : शरद पवार गटाचं खातं उघडलं; माढ्यात अभिजीत पाटलांचा १३६५५९ मतांनी विजय

Madha Vidhan Sabha Election Result 2024 : लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही लक्ष लागून राहिलेल्या माढा विधानसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागला आहे. माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजीत पाटील विजयी झाले आहेत. अभिजीत पाटील यांनी अजित पवार गटाच्या मीनल साठे आणि रणजित शिंदे यांचा पराभव केला आहे. माढ्यातल्या या तिरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होतं. मात्र शरद पवार गटाच्या अभिजीत पाटील यांनी निवडणुकीत बाजी मारली आहे.

अभिजीत पाटील यांना १३६५५९ मते मिळाली आहेत. रणजित शिंदे यांना १०५९३८ मतं मिळालं आहेत. अभिजीत पाटील यांनी रणजित शिंदे यांचा ३०६२१ मतांनी पराभव केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील हे सुरुवातीपासून आघाडीवर होते. तर अपक्ष उमेदवार रणजित शिंदे हे दुसऱ्या क्रमांकावर होते. १८ व्या फेरीअखेर अभिजीत पाटील हे १३६१५ मतांनी आघाडीवर होते.

माढा मतदारसंघातील लढत अटीतटीची मानली जात होती. माढ्याच्या तिंगरी लढतीत विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे, शरद पवार गटाचे अभिजीत पाटील तर महायुतीकडून अजित पवार गटाच्या मिनल साठे निव़डणूक लढवत होत्या. सुरुवातीपासूनच अभिजीत पाटील यांनी मोठी आघाडी घेतली होती. २६ व्या फेरीअखेर अभिजीत पाटील यांनी आपला विजय निश्चित केला.

दरम्यान, अभिजीत पाटील यांच्यासाठी शरद पवार यांच्यासह दिग्गजांनी माढ्यात सभा घेतल्या होत्या. त्यामुळे अभिजीत पाटील यांना  मोठा फायदा झाला. झाल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर माढ्याचे पूर्वीचे आमदार बबनदादा शिंदे हे अजित पवार गटासोबत गेले होते. विधानसबेच्या निवडणुकीत मात्र बबनदादा यांनी पुत्र रणजित शिंदे यांना अपक्ष निवडणुकीत उभे केले. त्यामुळे अजित पवार यांनी काँग्रेसच्या मिनल साठे यांनी तिकीट देऊन सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं.   
 

Web Title: Madha vidhan sabha assembly election result 2024 Abhijit Patil of NCP Sharad Pawar party wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.