माढेश्वरी बँक देणार सभासदांच्या ठेवीवर पाच लाखांचे विमा संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:24 AM2021-09-27T04:24:32+5:302021-09-27T04:24:32+5:30
माढा : माढेश्वरी अर्बन बँकेची २६वी सभाही ऑनलाइन पार पडली. सध्या बँकेची वाटचाल २०० कोटींकडे सुरू असून सभासदांच्या ठेवींवर ...
माढा : माढेश्वरी अर्बन बँकेची २६वी सभाही ऑनलाइन पार पडली. सध्या बँकेची वाटचाल २०० कोटींकडे सुरू असून सभासदांच्या ठेवींवर पूर्वी १ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण होते ते आता ५ लाखांपर्यंत केल्याचे बँकेच्या वतीने सांगण्यात आले.
या बैठकीस बँकेचे चेअरमन बबनराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिंदे यांनी कोरोना काळात संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यामुळे बँकेला १ कोटी ३६ लाख ७४ हजार रुपये नफा झाल्याचे सांगत सभासदांना सात टक्के लाभांश वाटप करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
बँकेचे व्हा.चेअरमन अशोक लुणावत यांनी प्रास्ताविकेतून बँकेचा आढावा घेतला. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे यांनी विषयपत्रिका व अहवाल वाचन केले.
यावेळी डी. व्ही. चवरे, बँकेचे संचालक गणेश काशीद, बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील, उपळाई खुर्दचे सरपंच संदीप पाटील, ॲड. शैलेश मेहता, संचालक राजेंद्र पाटील, उदय माने, राहुल कुलकर्णी, नागनाथ जवळगे, ॲड नानासाहेब शिंदे, आजिनाथ इंगळे, संतोष लोंढे, भारत बोबडे, धनंजय शहाणे, नेताजी उबाळे, वसुली अधिकारी राजकुमार भोळे, वरिष्ठ अधिकारी नीलेश कुलकर्णी, संजय गायकवाड, लक्ष्मण शिंदे, प्रमोद शिंदे, अमोल मारकड, सागर काळे, सचिन खापरे, अनिल कदम, शिवाजी घाडगे उपस्थित होते.
----
फोटो : २६ माढेश्वरी
कोरोनात पालकत्व गमावलेल्या कुटुंबाला, विद्यार्थ्यांना माढेश्वरी बँकेच्या वतीने आर्थिक साहाय्य देताना चेअरमन बबनराव शिंदे आणि अशोक लुणावत.