माढ्यात ६ हजार ५१८ जणांना कोविड प्रतिबंधक लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:23 AM2021-03-23T04:23:38+5:302021-03-23T04:23:38+5:30

कुर्डूवाडी : लसीकरण मोहिमेअंतर्गत माढा तालुक्यात आरोग्य कर्मचारी, तहसील कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी यांसह इतर शासकीय व्यक्ती आणि ...

In Madhya Pradesh, 6 thousand 518 people were vaccinated against measles | माढ्यात ६ हजार ५१८ जणांना कोविड प्रतिबंधक लस

माढ्यात ६ हजार ५१८ जणांना कोविड प्रतिबंधक लस

Next

कुर्डूवाडी : लसीकरण मोहिमेअंतर्गत माढा तालुक्यात आरोग्य कर्मचारी, तहसील कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी यांसह इतर शासकीय व्यक्ती आणि ६० वर्षांवरील व्यक्ती अशा एकूण ६ हजार ५१८ व्यक्तींना पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे.

यामध्ये आरोग्य कर्मचारी व इतर शासकीय विभागाचे १७२३, खासगीचे ७२३ ,फ्रन्टलाइन वर्कर १०११, पंचायत समिती कर्मचारी २८७, कोर्मावीड व्यक्ती ५२९ व ६० व या पुढील २२३४ व्यक्तींना लसीकरण केले आहे. यात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या ५ हजार ३२७ व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या १९९१ आहे.

माढा तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने डोके वर काढले आहे.एकीकडे प्रशासन सातत्याने गर्दी टाळण्याचे आवाहन करीत असताना नागरिकांकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. परिणामत: टेंभुर्णी, निमगाव (टे), विठ्ठलवाडी, कुर्डूवाडी ही चार गावे पुन्हा हाॅटस्पाॅट बनली आहेत. येथील रुग्णसंख्या सध्या ही दहापेक्षा अधिक आहे.

माढा तालुक्यात डिसेंबरमध्ये ६ हजार ३५८ चाचण्या केल्या असता २१७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. जानेवारी महिन्यात ५ हजार ५६१ चाचण्या केल्या असता १३८ रुग्ण आढळले. फेब्रुवारी महिन्यात ३ हजार ५६५ चाचण्या केल्या असता ११९ रुग्ण आढळले. मार्च महिन्यात पंधरवड्यातच १ हजार ८९६ चाचण्या केल्या असता १४० इतके रुग्ण आढळलेले आहेत.

---

पुन्हा कोविड सेंटर सुरू

जानेवारी,फेब्रुवारी महिन्यात कमी असलेली रुग्ण संख्या ही मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात वाढल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिलेले आहे. डिसेंबर ते मार्च या कालावधीत १२ जणांना कोरोनाने जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाने श्रीराम मंगल कार्यालय कुर्डूवाडी येथे पुन्हा कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.

--

माढ्यात लसीकरण मोहिमेस २५ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून त्याचा आतापर्यंत ६ हजार ५१८ व्यक्तींना त्याचा लाभ मिळाला आहे. अजूनही काही लाभार्थी लसीला भीत आहेत. या लसीकरनाने काहीही साईट इफेक्ट होत नाहीत. शिक्षकांनाही त्यांनाही लवकरच लस देण्यात येईल.

- डॉ. शिवाजी थोरात

तालुका आरोग्य अधिकारी, माढा

.----

सहा ठिकाणी लसीकरण

कोरोना काळात नेमलेल्या शिक्षकांनीही सर्वेक्षणासह इतर कामे केल्याने त्यांना ही लस लवकर मिळावी अशी मागणी तालुक्यातील शिक्षकांतून होत आहे. ग्रामीण रुग्णालय माढा, कुर्डूवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभुर्णी, मोडनिंब, पिंपळनेर, उपळाई (बु.) व परिते या ठिकाणी लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. नियोजनात्मक कामामुळे लसीकरण अगदी व्यवस्थित पार पडत आहे.

Web Title: In Madhya Pradesh, 6 thousand 518 people were vaccinated against measles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.