माढ्यात ९,६८९ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:20 AM2021-05-17T04:20:39+5:302021-05-17T04:20:39+5:30

टेंभुर्णी, निमगाव टें, पिंपळनेर, चांदज, आढेगाव, राजणी, मोडनिंब, तुळशी, भोसरे, उंदरगाव, अकोले(खु.), कुर्डूवाडी, धानोरे, कन्हेरगाव ही गावे या दुसऱ्या ...

In Madhya Pradesh, 9,689 people were released from coronation and returned home | माढ्यात ९,६८९ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले

माढ्यात ९,६८९ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले

Next

टेंभुर्णी, निमगाव टें, पिंपळनेर, चांदज, आढेगाव, राजणी, मोडनिंब, तुळशी, भोसरे, उंदरगाव, अकोले(खु.), कुर्डूवाडी, धानोरे, कन्हेरगाव ही गावे या दुसऱ्या टप्प्यात हाॅटस्पाॅट ठरली होती. शासनाच्या निकषाची अंमलबजावणी काटेकोरपणे न केल्याने बाधित रुग्णांचा शहरात व शेजारच्या गावात मुक्त वावर सुरू झाला. याच बाधित रुग्णांनी सुपर स्प्रेडरचे काम केले आहे.

तालुका प्रशासन व आ. बबनराव शिंदे, आ. संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून तालुक्यात १२ ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारली आहेत. विविध खासगी रुग्णालयांना कोविड हाॅस्पिटलची मान्यता देण्यात आली. त्यामुळे रुग्णांवर योग्यवेळी उपचार करणे शक्य झाले; परंतु तालुक्यात एकही सुपर मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल नसावे, ही मात्र दुर्दैवाची बाब आहे. यामुळे ऐनवेळी गंभीर, अत्यवस्थ रुग्णांची मोठी धावाधाव तर होतच आहे; पण योग्यवेळी योग्य उपचाराअभावी अनेकांना जीव गमवावा लागत आहे.

---

Web Title: In Madhya Pradesh, 9,689 people were released from coronation and returned home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.