महावितरणचे डीपी फोडून तांब्याची तार आॅईल चोरणारी टोळी जेरबंद
By admin | Published: June 26, 2017 08:12 PM2017-06-26T20:12:21+5:302017-06-26T20:12:21+5:30
महावितरणचे डिपी फोडून ताब्याची तार व आॅईल चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेचे जेरबंद केले
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २६ - जिल्ह्यातील ग्रामीण भागात महावितरणचे डीपी फोडून ताब्याची तार व आॅईल चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेचे जेरबंद केले. पोलिसांनी टोळीकडून १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आज करण्यात आली.
विलास कृष्णा भगवे (रा.विजयवाडी. ता.माळशिरस), सोमनाथ अरुण काळे (रा.देशमुखवस्ती करकंब), मच्छिंद्र श्रीपती काळे (रा.वेळापूर.ता. माळशिरस) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सोलापूर ग्रामीण भागात महावितरणच्या डिपी चोरी करुन त्यातील तांब्याच्या तारा व आॅईल चोरीचे प्रकार वाढल्याने पोलीस अधिक्षक विरेश प्रभु यांनी याबाबत तपास करुन हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीना ताब्यात घेऊन चौकशी केले असता, त्याने माढा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील जामगांव येथे डीपी चोरल्याची कबुली दिली. पोलीसांनी आरोपीकडून ४०२ किलो ताब्यांची तार असा एकुण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलीस अधिक्षक विरेश प्रभु, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिद मोहीते , विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक बाबुराव म्हेत्रे, पोलीस हवालदार नारायण गोलेकर, मारुती रणदिवे, गोरक्षनाथ गांगुर्डे, पोलीस नाईक विजय भरले, मोहन मनसावले, पोकॉ. सागर शिंदे, सचिन मागाडे, ईस्माईल शेख आदींनी ही कामगिरी केली.
आरोपीकडून दहा गुन्हे उघडकीस
पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका, मोहोळ, वैराग, वेळापूर व करकंब या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील आॅईल चोरी केल्याची कबुली आरोपीने स्थानिक गुन्हे शाखेला दिली. आरोपीकडून दहा गुन्हे उघडकीस आले आहेत.