महादेव खांडेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:19 AM2021-04-26T04:19:50+5:302021-04-26T04:19:50+5:30

मंगळवेढा : मंगळवेढा तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन महादेव आगतराव खांडेकर (६२, रा. हिवरगाव, ता. मंगळवेढा) यांचे निधन झाले. ...

Mahadev Khandekar passes away | महादेव खांडेकर यांचे निधन

महादेव खांडेकर यांचे निधन

Next

मंगळवेढा : मंगळवेढा तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन महादेव आगतराव खांडेकर (६२, रा. हिवरगाव, ता. मंगळवेढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.

त्यांनी यापूर्वी मंगळवेढा कृषी उद्योग संघ, हिवरगावचे सरपंच, हिवरगाव विकास सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणून काम पाहिले आहे.

प्रभाकर नागणे

मंगळवेढा : संत दामाजीनगर ग्रामपंचायतीचे सदस्य प्रभाकर ऊर्फ सोनू संभाजीराव नागणे (३६, रा. किराणा रोड, मंगळवेढा)

यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, बहीण, असा मोठा परिवार आहे.

सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी संभाजीराव नागणे यांचे ते चिरंजीव होत.

विठ्ठल पाटील

मंगळवेढा : विठ्ठल वेताळ पाटील (५९, रा. नंदेश्वर भोसे, तालुका मंगळवेढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे, असा परिवार आहे. ते भोसे गावातील भुसार मालाचे प्रसिद्ध व्यापारी होते, तसेच भोसे गावचे माजी सरपंच कालिदास पाटील यांचे ते बंधू होत.

अशोक आलाटे

सोलापूर : अशोक नामदेव आलाटे (३७, रा. अकोलेकाटी, ता. उत्तर सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, बहीण, दोन मुली, असा परिवार आहे.

मल्लय्या वाडी-स्वामी

सोलापूर : मल्लय्या रेवणय्या वाडी-स्वामी (७९, रा. धोत्रीकर वस्ती, भवानी पेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, चार मुली, जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे.

सुमन जाधव

लांबोटी : सुमन भारत जाधव (७०, लांबोटी, ता. मोहोळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, मुलगी व नातवंडे, असा परिवार आहे. जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष विकास जाधव यांच्या त्या मातोश्री होत.

Web Title: Mahadev Khandekar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.