मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडला महाद्वार काला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:22 AM2021-07-26T04:22:19+5:302021-07-26T04:22:19+5:30

संत नामदेव महाराज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या वंशजांकडून महाद्वार काला करण्याची चारशेहून अधिक वर्षाची परंपरा आहे. पांडुरंग ...

Mahadwar Kala passed in the presence of few devotees | मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडला महाद्वार काला

मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडला महाद्वार काला

Next

संत नामदेव महाराज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या वंशजांकडून महाद्वार काला करण्याची चारशेहून अधिक वर्षाची परंपरा आहे. पांडुरंग महाराज हरिदास यांना प्रत्यक्ष विठ्ठलाने आपल्या खडावा अर्थात पादुकांचा प्रसाद देत काला करण्याची आज्ञा दिली होती. त्यानुसार हरिदास घराण्यात अकरा पिढ्यांपासून हा उत्सव साजरा केला जातो. संत नामदेव महाराजांच्या वंशजांना येथे दिंडीचा मान आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा काल्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात केवळ अकरा जणांना प्रवेश देण्यात आला.

परंपरेप्रमाणे दुपारी बारा वाजता काल्याचे मानकरी मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर देवाच्या पादुका पागोट्याने बांधण्यात आल्या. यानंतर मंदिरातील सभामंडप येथे पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर दहीहंडी फोडण्यात आली. यानंतर हा उत्सव महाद्वार घाटावरून चंद्रभागेचे वाळवंट, कुंभार घाट, माहेश्‍वरी धर्मशाळा, आराध्ये गल्ली, हरिदास वेस येथून काल्याच्या वाड्यात दाखल झाला.

यावेळी उपस्थित भाविकांकडून कुंकू-बुक्क्याची उधळण करण्यात येत होती.

यावेळी उपस्थितांना लाह्या, दही, दूध आदींपासून बनविलेल्या काल्याचे वाटप करण्यात आले. मागील वर्षीप्रमाणे यंदाही कमी भाविकांच्या उपस्थितीत महाद्वार काला पार पडला. महाद्वार काला साजरा झाल्यानंतर पंढरीतील संचारबंदी उठविण्यात आली.

फोटो ::::::::::::::::::::::::::

पंढरपूर येथे महाद्वार काल्याचा प्रसाद वाटप करताना उपस्थित भाविकभक्त व अन्य.

Web Title: Mahadwar Kala passed in the presence of few devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.