मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडला महाद्वार काला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:41 AM2020-12-05T04:41:31+5:302020-12-05T04:41:31+5:30

परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात हंडी फोडण्यात आली. श्रीसंत नामदेव महाराज व श्रीसंत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या वंशजांकडून आषाढी व ...

Mahadwar Kala was passed in the presence of few devotees | मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडला महाद्वार काला

मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडला महाद्वार काला

Next

परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात हंडी फोडण्यात आली. श्रीसंत नामदेव महाराज व श्रीसंत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या वंशजांकडून आषाढी व कार्तिकी वारीमध्ये महाद्वार काल्याचा सोहळा साजरा करण्याची परंपरा आहे.

श्रीसंत पांडुरंग महाराज यांना चारशे वर्षांपूर्वी प्रत्यक्ष विठुरायाने आपल्या खडावा अर्थात पादुका दिल्या होत्या, अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात मोजक्याच भक्तांना प्रवेश देऊन हा उत्सव साजरा केला. यावेळी मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर देवाच्या पादुका पागोट्याने बांधल्या. यानंतर नामदास महाराज यांनी मदन महाराज यांना खांद्यावर घेऊन मंदिरातील सभामंडप येथे पाच प्रदक्षिणा पूर्ण करून दहीहंडी फोडली. यानंतर परंपरेप्रमाणे हा काला मार्गक्रमण करीत पुन्हा काल्याच्या वाड्यात दाखल झाला.

दशमी व एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी संचारबंदी पुकारली होती. तर २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेचे दर्शन बंद ठेवले होते. कोरोनामुळे पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर १७ मार्चपासून आठ महिने बंद होते. ते दिवाळी पाडव्यापासून भक्तांसाठी खुले केले आहे.

ऑनलाइन बुकिंगनंतर मुखदर्शनाची व्यवस्था

सध्या भाविकांना कोरोनाविषयक आरोग्याचे सर्व नियम पाळून श्रींचे ऑनलाइन बुकिंगनंतर मुखदर्शन देण्याची व्यवस्था समितीने केली आहे. याचा लाभ दररोज ३ हजार भाविकांना मिळत आहे. दरम्यान, मंदिर दर्शनासाठी बंद होते तेव्हा श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेचे सर्व नित्योपचार व राजोपचार परंपरेप्रमाणे सुरू होते.

फोटो लाईन

०२पंड०१

श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात कार्तिकी यात्रेनिमित्त महाद्वार काल्यादरम्यान हंडी फोडताना भाविक.

Web Title: Mahadwar Kala was passed in the presence of few devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.