अंत्यविधीसाठी धावून आली महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:19 AM2021-04-26T04:19:34+5:302021-04-26T04:19:34+5:30
कोरोनाबाधित असल्याने शेजारी, पाजारी, पाहुण्यांनी हात लावायचे धाडस दाखवले नाही. काही काळ मृतदेह घरातच होता. यानंतर महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या प्रशासकांनी ...
कोरोनाबाधित असल्याने शेजारी, पाजारी, पाहुण्यांनी हात लावायचे धाडस दाखवले नाही. काही काळ मृतदेह घरातच होता. यानंतर महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या प्रशासकांनी मदत केल्यानंतर कोरोनाबाधित इसमावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
महाळुंग येथील कोरोनाबाधित इसमाच्या मृत्यूची स्थानिक नागरिकांनी महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्याप्रशासकांना फोनवरून माहिती देण्यात आली. तसेच महाळुंग कार्यालयानेदेखील सदर घटनेची वस्तुस्थिती अधिकाऱ्यांना सांगितली. याची तत्काळ दखल घेत, तहसीलदारांनी अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य महाळुंग कार्यालय येथील कामगारामार्फत स्मशानभूमीमध्ये आणून अंत्यविधीसाठी तयारी केली. अकलूजवरून अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने ॲम्ब्युलन्स बोलवण्यात आली. परंतु अहिल्यानगर परिसरात सार्वजनिक स्मशानभूमी नसल्याने सदरच्या प्रेतावर शहीद निवृत्ती नगर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
यासाठी महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीचे कर्मचारी दत्तात्रय यादव, प्रशांत कुलकर्णी, शिवाजी चव्हाण, विजय भोसले, जजीरथ जाधव, महादेव जाधव, पिनू भोसले, कोतवाल संभाजी चव्हाण, महेश वाघमारे, रवी चव्हाण व ॲम्बुलन्समधील कर्मचाऱ्यांनी अंत्यविधीसाठी सहकार्य केले.