बार्शी शहर कोणाला लीड देणार, यावर ठरणार तालुक्याचा आमदार; प्रमुख नेत्यांच्या गावातील मतांकडे लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 11:35 AM2024-11-22T11:35:16+5:302024-11-22T11:36:11+5:30

बार्शी विधानसभा मतदारसंघात लोकसभेला २ लाख ९ हजार ७५४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 barshi MLA will decide on who will lead in city | बार्शी शहर कोणाला लीड देणार, यावर ठरणार तालुक्याचा आमदार; प्रमुख नेत्यांच्या गावातील मतांकडे लक्ष!

बार्शी शहर कोणाला लीड देणार, यावर ठरणार तालुक्याचा आमदार; प्रमुख नेत्यांच्या गावातील मतांकडे लक्ष!

शहाजी फुरडे-पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क |

Barshi Vidhan Sabha ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीसाठी बार्शी मतदारसंघात शांततेत परंतु चुरशीने मतदान झाले. आता उद्या मतमोजणी होऊन निकाल समजणार असला तरी गावोगावी मात्र कोणाला लीड मिळणार? राजेंद्र राऊत की दिलीप सोपल निवडून येणार याविषयी चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही गटांचे कार्यकर्ते आकडेमोड करण्यात गुंग झाले आहेत. २०१९ ला राजेंद्र राऊत हे ३ हजार मतांनी विजयी झाले होते. बार्शी विधानसभा मतदारसंघात लोकसभेला २ लाख ९ हजार ७५४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर या निवडणुकीत २ लाख ४६ हजार ७१२ एवढे मतदान झाले आहे.
 
म्हणजेच लोकसभेपेक्षा ३६९५८ मतदान जास्त झाले आहे. बार्शी तालुका हा तसा तीन भागात विभागला जातो. यामध्ये वैरागभागव ५७ गावे. उत्तर बार्शीतील ८२ गावे आणि बार्शी शहराचा समावेश आहे. सर्वजाती-धर्मांचे मोठ्या प्रमाणात मतदान असलेले बार्शी शहर हे मतदारसंघातील सर्वांत मोठे शहर आहे. शहरातील सुमारे १ लाख ५ हजार मतदारांपैकी ७६ हजार ३८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. लीडच्या गणितात बार्शीच रोलही निर्णायक राहणार आहे.

मोठ्या नेत्यांच्या गावातील झालेले मतदान 

ग्रामीण भागातील खालील गावे तालुक्यातील मोठी तर आहेतच परंतु या गावात दोन्ही पक्षांचे प्रमुख नेतेही आहेत. गावातील लीडवर त्या कथित पुढाऱ्यांचे वजनही दिसून येणार आहे. मागील निवडणुकीत मोठ्या गावाने आमदार राऊत यांना चांगला लीड दिला होता. तर वैराग भाग आणि उत्तर बार्शीतील ग्रामीण भागाने लीड दिला होता तर शहर मायनस होते. 

पानगाव - ४४१८, पांगरी ४२४०, उपळाई-३८१९, कारी-३३८७, उपळे दु-३३९८, आगळगाव-२६४३, खांडवी-२६२९, शेळगाव आर-२५८३, मालवंडी-२६८८, कोरफळे २५८९, गौडगाव-२४०१, सुर्डी-२३९५, नारी- २३६८, भातम्बरे-२३९८, श्रीपतपिंपरी-२३५१, सासुरे-२२७४, मळेगाव १८६५, बावी-२३३४ याप्रमाणे मतदान झाले आहे.

वैराग अन् ५७ गावांवर सर्वांच्या नजरा 

वैराग शहरात यंदा १६६८१ पैकी ११६८१ जणांनी मतदान केले आहे. मागील विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले निरंजन भूमकर हे सोपल यांच्याकडे असल्याने इथे कोण आघाडी घेणार हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे बार्शीचा निकाल हा शहर आणि वैराग भागाने कोणाला साथ दिली आहे यावरून निश्चित होणार आहे.
 

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 barshi MLA will decide on who will lead in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.