सोलापुरात महाराष्ट्र बॅँकेची ७० लाखांची रोकड लुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:07 AM2017-11-02T01:07:18+5:302017-11-02T01:07:39+5:30
बँक आॅफ महाराष्ट्रची रोकड घेऊन निघालेली मोटार अडवून, शाखा व्यवस्थापकाच्या डोळ्यांत चटणी फेकून ७० लाख रुपये लुटल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी खर्डी (ता. पंढरपूर) येथे घडला.
पंढरपूर (जि. सोलापूर) : बँक आॅफ महाराष्ट्रची रोकड घेऊन निघालेली मोटार अडवून, शाखा व्यवस्थापकाच्या डोळ्यांत चटणी फेकून ७० लाख रुपये लुटल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी खर्डी (ता. पंढरपूर) येथे घडला.
बॅँक आॅफ महाराष्ट्रच्या सांगोला येथील शाखा व्यवस्थापक अमोल भोसले हे आपल्या मोटारीतून ७० लाखांची रोकड घेऊन पंढरपूर येथील बॅँकेत जमा करण्यासाठी निघाले होते. दफ्तरनीस नागनाथ शिर्के समवेत होते. खर्डी हद्दीत गाडी आल्यानंतर पाठीमागून येणाºया एका चार चाकी गाडीने त्यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला. भोसले यांनी मोटार बाजूला घेताच दुसºया गाडीमधील चार जण उतरले़ गाडीची काच फोडून आत असलेल्या भोसले व शिर्के यांच्या डोळ्यांत त्यांनी चटणी टाकली व सुटकेस तसेच कापडी गाठोड्यातील ७० लाखांची रोकड पळवून नेली़