Maharashtra Election 2019: तुझ्या बापाला तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही; प्रणिती शिंदेंना नरसय्या आडमांची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 06:05 PM2019-10-08T18:05:57+5:302019-10-08T18:08:08+5:30

सर्वांची संपत्ती वाढली मात्र माझ्यावर 175 गुन्हे वाढले, 200 केसेस झाल्याशिवाय गप्प बसणार नाही.

Maharashtra Election 2019: Your father will not remain silent until he is imprisoned; Praniti Shinde threatens Adam Masters | Maharashtra Election 2019: तुझ्या बापाला तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही; प्रणिती शिंदेंना नरसय्या आडमांची धमकी

Maharashtra Election 2019: तुझ्या बापाला तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही; प्रणिती शिंदेंना नरसय्या आडमांची धमकी

Next

सोलापूर - महाराष्ट्रात माझ्या एवढ्या केसेस कोणाच्या अंगावर आहे तर दाखवा. तुमच्यावर 5 केस पडल्या तर लटपटायला लागता. तुझ्या बापाला तुरुंगात घातल्याशिवाय गप्प बसणार नाही, जो माणूस पंतप्रधानांना इथं आणू शकतो तो काहीही करु शकतो अशा शब्दात माकपचे उमेदवार नरसय्या आडम यांनी काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना धमकी दिली आहे. सोलापूरच्या सभेत ते बोलत होते. 

यावेळी बोलताना नरसय्या आडम म्हणाले की, वृत्तपत्रांनी काही दिवसांपूर्वी छापलं नरसय्या आडम यांच्यावरील गुन्ह्यात वाढ झाली. पण मी सांगतो, सर्वांची संपत्ती वाढली मात्र माझ्यावर 175 गुन्हे वाढले, 200 केसेस झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. मी चोरी, डाका, फसवणूक या केसेस नाही तर परवानगी नसताना सभा घेणे, मोर्चे काढले, सत्याग्रह केला, धरणे आंदोलन केले, रस्ता रोको केला याचे गुन्हे आहेत. हे गुन्हे माझ्यासाठी अलंकार आहेत असं त्यांनी सांगितले. 

सोलापूर मध्य मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रणिती शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहे तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नरसय्या आडाम यांच्याशी लढत होणार आहे. 

Web Title: Maharashtra Election 2019: Your father will not remain silent until he is imprisoned; Praniti Shinde threatens Adam Masters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.