Maharashtra Lok Sabha election results 2024: पिपाणीने केला तुतारीचा घात; दहा मतदारसंघांत घेतली ४ लाखांहून अधिक मते, तरीही शरद पवार गट ठरला सरस

By राकेश कदम | Published: June 6, 2024 08:09 AM2024-06-06T08:09:27+5:302024-06-06T08:10:57+5:30

Maharashtra Lok Sabha election results 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयाेगाने अजित पवार गटाला ‘घड्याळ’, तर शरद पवार गटाला ‘तुतारी वाजविणारा माणूस’ हे नवीन चिन्ह दिले.

Maharashtra Lok Sabha election results 2024: Pipani made a Tutari attack; More than 4 lakh votes were taken in 10 constituencies, still Sharad Pawar group emerged victorious | Maharashtra Lok Sabha election results 2024: पिपाणीने केला तुतारीचा घात; दहा मतदारसंघांत घेतली ४ लाखांहून अधिक मते, तरीही शरद पवार गट ठरला सरस

Maharashtra Lok Sabha election results 2024: पिपाणीने केला तुतारीचा घात; दहा मतदारसंघांत घेतली ४ लाखांहून अधिक मते, तरीही शरद पवार गट ठरला सरस

साेलापूर : लाेकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दहा जागा लढविल्या. या दहा मतदारसंघांत पवार गटाच्या ‘तुतारी वाजविणारा माणूस’ या चिन्हासाेबत निवडणूक आयाेगाच्या ‘तुतारी’ अर्थात ‘ट्रम्पेट’ या चिन्हावर लढलेल्या अपक्ष उमेदवारांना मिळालेली चार लाख ३२ हजार २११ मते चकित करणारी आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयाेगाने अजित पवार गटाला ‘घड्याळ’, तर शरद पवार गटाला ‘तुतारी वाजविणारा माणूस’ हे नवीन चिन्ह दिले. पवार गटाने गावपाड्यावर ‘तुतारी’ वाजवून या चिन्हाचा प्रसार केला; परंतु प्रत्यक्षात निवडणुकीत सर्वच मतदारसंघात ‘तुतारी’ या शब्दाने पवार गटाची अडचण केल्याचे दिसून आले. ‘ट्रम्पेट’ हे ब्रिटिश वाद्य आहे. आपल्याकडचे वाजंत्री त्याला पिपाणी म्हणतात. निवडणूक आयाेगाने या चिन्हाला ‘तुतारी’ असे नाव दिले हाेते.

निवडणूक बॅलेट पेपरवर अपक्ष उमेदवारांच्या चिन्हासमाेर ‘तुतारी’ असाच उल्लेख केला. मतदानाच्या वेळी काेणत्या ‘तुतारी’समाेरचे बटन दाबायचे यावरून गाेंधळ उडाल्याचे पवार गटाचे म्हणणे आहे. सातारा वगळता इतर आठ मतदारसंघांत या पिपाणीवर मात करून पवार गटाचे उमेदवार विजयी झाले. अनेक ठिकाणी या चिन्हांवरून मतदारांमध्ये गोंधळ उडाल्याचे दिसले. 

तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर,  या सहा ठिकाणी काय घडले?
बारामती मतदारसंघात साेयलशहा शेख १४ हजार ९१७ मते घेऊन चाैथ्या क्रमांकावर.
शिरूरमध्ये अपक्ष उमेदवार मनाेहर वाडेकर यांनी २८ हजार ३३० मते घेतली. ते मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर राहिले.  
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार माेहन आळेकर ४४ हजार ५९७ मते घेऊन तिसऱ्या क्रमाकांवर. 
रावेरमध्ये एकनाथ साळुंखे ४३ हजार ९८२ मते घेऊन चाैथ्या क्रमाकांवर. 
भिवंडीत न्यू राष्ट्रीय समाज पक्षाच्या कांचन वखारे यांनी २४ हजार ६२५ मते घेतली. त्या चाैथ्या क्रमाकांवर राहिल्या.  
वर्ध्यात माेहन रायकवर २० हजार ७९५ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

साताऱ्यात मतविभाजन, माढ्यात तिसऱ्या क्रमाकांवर
माढ्यातील न्यू राष्ट्रीय समाज पक्षाच्या रामचंद्र घुटुकडे यांना ‘तुतारी’ चिन्ह दिले. पवार गटाचे विजयी उमेदवार धैर्यशील माेहिते-पाटील यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा १ लाख २० हजार ८३७ मतांनी पराभव केला. ‘तुतारी’ चिन्ह घेऊन लढणारे घुटुकडे ५८ हजार ४२१ मते घेऊन तिसऱ्या क्रमाकांवर राहिले. घुटुकडे यांची मते आपलीच असल्याचा माेहिते-पाटलांचा दावा आहे. 
साताऱ्यात भाजपच्या उदयनराजे भाेसले यांनी पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांचा ३२ हजार ७७१ मतांनी पराभव केला. ‘तुतारी’ चिन्हावरचे अपक्ष उमेदवार संजय गाडे यांना ३७ हजार ६२ मते मिळाली. गाडे यांच्यामुळे मतविभाजन झाल्याचे पवार गटाचे म्हणणे आहे.

Web Title: Maharashtra Lok Sabha election results 2024: Pipani made a Tutari attack; More than 4 lakh votes were taken in 10 constituencies, still Sharad Pawar group emerged victorious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.