महाराष्ट्र-सौराष्ट्रचा संघाचा इंदिरा गांधी स्टेडियमवर सराव सुरू; उद्यापासून सोलापुरात रणजी सामना
By Appasaheb.patil | Published: February 1, 2024 01:44 PM2024-02-01T13:44:51+5:302024-02-01T13:45:14+5:30
बुधवारी रात्री उशिरा महाराष्ट व सौराष्ट हे दोन्ही रणजी संघ साेलापुरात दाखल झाले.
सोलापूर : येथील इंदिरा गांधी स्टेडियम (पार्क) मैदानावर २ फेब्रुवारीपासून महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र या दाेन संघांत रणजी सामना होत आहे. त्याच अनुषंगाने दोन्ही संघांचे खेळाडू सोलापुरात दाखल झाले असून आज सकाळपासून दोन्ही संघांतील खेळाडू पार्क मैदानावर सराव करीत आहेत. महाराष्ट्राचा कर्णधार केदार जाधव व सौराष्ट्र संघातील महत्त्वाचा खेळाडू चेतेश्वर पुजारा यांच्यासह अन्य खेळाडू सोलापुरात दाखल झाले असून दोन्ही संघातील खेळाडू इंदिरा गांधी स्टेडियमवर सराव करीत आहेत.
मागील काही राष्ट्रीय स्तरावरील सामन्यांचे उत्कृष्ट नियोजन केल्याने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनवर पुन्हा एक रणजी सामन्याची जबाबदारी टाकली. २०२४ या वर्षातील रणजीचा हा दुसरा सामना सोलापुरात हाेत आहे. दरम्यान, रणजी सामना यशस्वी करण्यासाठी जिल्हा असोसिएशनने विविध समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांच्या मार्फत विविध पातळीवर वेगाने तयारी करण्यात येत आहे. आगमन, राहण्याची व्यवस्था, मैदान, जेवण व अन्य सेवासुविधा वेळेत देण्यासाठी असोसिएशनचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. बुधवारी रात्री उशिरा महाराष्ट व सौराष्ट हे दोन्ही रणजी संघ साेलापुरात दाखल झाले.
अशी आहे सौराष्ट्रची टीम
जयदेव उनाडकट (कर्णधार), आदित्य जडेजा, अर्पित वासावडा, चेतेश्वर पुजारा, केविन जीवराजानी एस, विश्वराज जडेजा, चिराग जानी, पार्थ भूट, प्रेरक मांकड, हार्विक देसाई, शेल्डन जॅकसन, स्नेल पटेल, अंकुश पंवर, देवांग देवेंद्रभाई करमता, धमेंद्रसिंह जडेजा, युवराजसिंह दोडिया.
अशी आहे महाराष्ट्राची टीम
केदार जाधव (कर्णधार), अंकित बावणे, धनराज शिंदे, नौशाल शेख, ओम दत्तात्रेय भोसले, पवन शाह, आशाय पालकर, अझीम काझी, सिद्धेश वीर, निखिल नाईक, ओंकार खटपे, विशांत मोरे, हितेश वलुंज, प्रदीप दाधे, प्रशांत साेलंकी, रामकृष्ण घोष, विकी ओस्टवाल.