Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सोलापुरात भाजपच्या पाचही जागा पाडू म्हणणाऱ्या शिंदेसेनेत दोन गट; मध्यचा वाद पेटला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 11:12 AM2024-10-25T11:12:06+5:302024-10-25T11:26:38+5:30
देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला उघड विरोध
सोलापूर : महायुतीच्या जागावाटपात शहर मध्य विधानसभेची जागा शिंदेसेनेला मिळायला हवी. अन्यथा भाजपच्या जिल्ह्यातील पाच जागा पाडू, असा इशारा शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे व अन्य पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धोरण अडचणीत येईल, असे आम्ही काही करणार नाही, अशी भूमिका दुसरे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी जाहीर केले. शिंदे म्हणाले. सोलापर लोकसभा मतदारसंघातील एक जागा शिवसैनिकांची आहे. भाजपचे नेते येथून देवेंद्र कोठे यांना उमेदवारी देण्याची तयारी असल्याचे समजते. या उमेदवारीला आमचा जाहीर विरोध आहे. त्यांच्या घरातील एक माणूस पवार गटाकडून लढतो तर दुसरा भाजपकडून. हे असले राजकारण सर्वांना समजते.
शिवसैनिकांकडून शहर उत्तर, शहर मध् सोलापूर दक्षिण, मोहोळ आणि पंढरपूर मतदारसंघात उमेदवार देण्यात येईल. उमेदवार भाजपाला पाडण्यासाठी असतील. यावेळी शहर प्रमुख मनोज शेजवाल, उमे गायकवाड, हरिभाऊ चौगुले, तुकाराम मस्टे सागर शितोळे आदी उपस्थित होते.
मनीष काळजेंची वेगळी भूमिका
जिल्हाप्रमुख मनीष काळजे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहर मध्यची जागा शिंदेसेनेकडे घेतील याचा विश्वास आहे. पण यात काही बदल झाला तर आम्ही त्यांच्या आदेशाची वाट बघू. एकनाथ शिंदे यांचे धोरण अडचणीत येईल, असे आम्ही काही करणार नाही.
भाजप कार्यालयातही बैठक भाजपच्या शहर कार्यालयात शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या उपस्थितीत गुरुवारी दुपारी बैठक झाली. पक्षाकडून पाच जणांनी उमेदवारी मागितली आहे. यापैकी एकाला उमेदवारी द्यावी. इतरांना देऊ नये, असे पत्र पांडुरंग दिड्डी, अनंत जाधव, श्रीनिवास संगा, अंबादास गोरंट्याल यांनी काळे यांना दिली.