महाराष्ट्र विद्यालय शाळा ठरली तंबाखूमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:21 AM2021-04-11T04:21:59+5:302021-04-11T04:21:59+5:30
बार्शी : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभाग कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने बार्शी ...
बार्शी : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभाग कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने बार्शी तालुक्यातील अग्रेसर शिक्षक व विद्यार्थी संख्या असणारी महाराष्ट्र विद्यालय २०२१ - २०२३ या शैक्षणिक वर्षासाठी तंबाखूमुक्त शाळा ठरली आहे.
आरोग्य विभागाने पारित केलेले सुधारित नऊ निकष शाळेने पूर्ण केले आहेत. सलाम मुंबई फाऊंडेशनच्या जिल्हा समन्वयक शुभांगी लाड, सारथी फाऊंडेशनचे समन्वयक रामचंद्र वाघमारे, समन्वयक विवेकानंद जगदाळे आणि शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, मुख्याध्यापक डी. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. नोडल शिक्षक, संग्राम देशमुख, अतुल नलगे यांनी नवीन निकषांनुसार तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी सहशिक्षक शशिकांत लांडगे, सहशिक्षिका निर्मला साठे, पर्यवेक्षक जी. ए. चव्हाण यांनी उपक्रमासाठी सहकार्य केले.
---
१० महाराष्ट्र स्कूल
तंबाखूमुक्त ठरल्याचा संदेश रांगोळीतून संदेश देताना महाराष्ट्र शाळेच्या शिक्षिका आणि विद्यार्थिनी