केळी निर्यातीत महाराष्ट्राचा अटकेपार झेंडा; डाळिंब निर्यातीला खोड किडीचा 'खोडा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2022 10:51 AM2022-05-06T10:51:07+5:302022-05-06T10:51:13+5:30

केळी निर्यातीत देशात महाराष्ट्र प्रथम व उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर

Maharashtra's ban on banana exports; Pomegranate Exports | केळी निर्यातीत महाराष्ट्राचा अटकेपार झेंडा; डाळिंब निर्यातीला खोड किडीचा 'खोडा'

केळी निर्यातीत महाराष्ट्राचा अटकेपार झेंडा; डाळिंब निर्यातीला खोड किडीचा 'खोडा'

googlenewsNext

सोलापूर : केळी उत्पादन व निर्यातीत अटकेपार झेंडा रोवणारा महाराष्ट्र यंदा डाळिंबाबाबत खोड कीड रोग व नैसर्गिक आपत्तीच्या अटॅकने पिछाडीवर आला आहे. केळी निर्यातीत देशात महाराष्ट्र प्रथम व उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर तर डाळिंब निर्यातीत महाराष्ट्राला मागे टाकत पश्चिम बंगालने मोठी आघाडी घेतली आहे.

महाराष्ट्रात मागील तीन वर्षांत पाऊस चांगला पडतो आहे. सरासरी एवढा व सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद होत आहे. पाणी मुबलक असल्याने राज्यात यंदा ऊस व केळीचे उत्पादन अपेक्षेपेक्षा अधिक होत आहे. उच्चांकी साखर उत्पादनाप्रमाणे केळी उत्पादनातही महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे निर्यातही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. संपूर्ण भारतातून फेब्रुवारीअखेर ३ लाख ३३ हजार २६६ मे. टन केळी विविध देशांना निर्यात झाली आहे. आजपर्यंत डाळिंब लागवड व उत्पादनात महाराष्ट्राच्या जवळपासही इतर कोणतेच राज्य नव्हते. मात्र, यावर्षी महाराष्ट्रात डाळिंबावर खोड कीड रोगाने एकदम अटॅक केला आहे. यामध्ये झाडावर परिणाम झालाच, शिवाय उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घटले आहे.

 

  • संपूर्ण देशात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी डाळिंबाची निर्यात फेब्रुवारीपर्यंत २० हजार मे. टनाने वाढली असताना महाराष्ट्रात मात्र वाढण्याऐवजी तीन हजार टन निर्यात घटली आहे.
  • * मागील वर्षी (२०२०-२१) भारतातून ६७ हजार ९७६ मे. टन डाळिंबाची निर्यात झाली होती. त्यातून देशाला ५१६ कोटी रुपये परकीय चलन मिळाले होते. यावर्षी (२०२१-२२) फेब्रुवारीपर्यंत ८७ हजार ८७४ मे. टन डाळिंब निर्यातीतून शेतकऱ्यांना ६०२ कोटी रुपये मिळाले आहेत.
  • देशातील संपूर्ण राज्ये एकीकडे तर एकटा महाराष्ट्र केळी निर्यातीत भारी ठरला आहे.
  • २०२०-२१ मध्ये २ लाख ३२ हजार ५१८ केळी निर्यातीतून देशाला ७४० कोटी तर २१-२२ मध्ये फेब्रुवारीपर्यंत ३ लाख ३३ हजार २६५ मे. टन केळी निर्यातीतून देशाला १ हजार ३५ कोटी रुपये परकीय चलन मिळाले आहे.
  • २१-२२ मध्ये महाराष्ट्रातून निर्यात झालेल्या २ लाख ४१ हजार ५०९ मे. टन केळी निर्यातीतून ८०५ कोटी तर २०-२१ मध्ये १ लाख ६३ हजार ६२५ मे. टन केळी निर्यातीतून ५५६ कोटी परकीय चलन मिळाले होते.
  • * २०२१-२२ मध्ये १४६०४ मे. टन डाळिंब निर्यातीतून महाराष्ट्राला २०९ कोटी तर २०२०-२१ मध्ये १७७२४ मे. टन डाळिंब निर्यातीतून २२३ कोटी रुपये मिळाले होते.

राज्यातील विशेषत: सोलापूर, सांगली, इंदापूर भागातील डाळिंब पीक खोड किडीने उद्ध्वस्त झाले. यामुळे शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. खर्च करून आणलेले डाळिंब पीक वाचविण्यासाठी पुन्हा खर्चाचा भार सोसला आहे.

- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ

 

Web Title: Maharashtra's ban on banana exports; Pomegranate Exports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.