राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत वैयक्तिक सॅबर प्रकारात महाराष्ट्राची स्नेहल पवार आणि स्नेहल विधाते यांची विजयी सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 05:23 PM2017-12-23T17:23:19+5:302017-12-23T17:27:06+5:30
केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या अधिपत्याखाली आणि सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सहकायार्ने सुरू झालेल्या २८ व्या वरीष्ठगट राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत शनिवारी "सॅबर" या प्रकारात बाद महिलांच्याया बाद फेरीत महाराष्ट्राच्या स्नेहल पवार आणि स्नेहल विधाते यांनी विजयी सलामी दिली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर : केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या अधिपत्याखाली आणि सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सहकायार्ने सुरू झालेल्या २८ व्या वरीष्ठगट राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत शनिवारी "सॅबर" या प्रकारात बाद महिलांच्याया बाद फेरीत महाराष्ट्राच्या स्नेहल पवार आणि स्नेहल विधाते यांनी विजयी सलामी दिली.
सिंहगड इन्स्टिट्यूट कॅम्पसमध्ये अद्ययावत मैदानावर इलेक्ट्रॉनिक्स आॅपरेटर्सवर शनिवारपासून मोठ्या थाटात राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेला प्रारंभ झाला. २५ हुन अधिक राज्यातील सुमारे ८१० खेळाडू आणि पंच दाखल झाले आहेत. तलवारबाजीचा हा खेळ पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. सिंहगडाचे संचालक संजय नवले यांनी स्पर्धेत भाग घेणाºया खेळाडूंसाठी कोणतीही कसर ठेवलेली नाही.
दरम्यान शनिवारी दिवसभरात सॅबर या वैयक्तिक प्रकारातील महिलांचे बाद फेरीचे सामने झाले.ज्यामध्ये महाराष्ट्राच्याया स्नेहल पवार हिने बिहारच्या निकिता साहू हिचा १५ विरुध्द ११ गुणाने पराभव केला.तर दुसºया सामन्यात महाराष्ट्राच्याच स्नेहल पवार हिने तेलंगणाच्या काव्या हिचा १५ विरुद्ध १० गुणाने पराभव केला.हे दोन्ही सामने सुरवातीला अटीतटीचे झाले. मात्र महाराष्ट्राच्या मुलींनी बिहार आणि तेलंगणाच्या मुलींना अखेरपर्यंत झुंजवले आणि विजयी सलामी दिली.
----------------
अन्य निकाल पुढीलप्रमाणे
ज्योत्स्ना (केरळ ) विजयी विरुद्ध गुंजन ( चंदीगड) १५ -१,जसप्रित कौर (जम्मू काश्मीर ) विजयी विरुद्ध मालवीया (मध्यप्रदेश )१५-७,जगमित (पंजाब ) विजयी विरुद्ध वनिका ( हरियाणा ) १५-७, कोमल प्रित (पंजाब ) विजयी विरुद्ध गरिमा (हिमाचल प्रदेश ) १५-३,देवी चेरीश (सेनादल )विजयी विरुद्ध टीना (दिल्ली ) १५-१,रिशा लागू (केरळ ) विजयी विरुद्ध दिव्या (दिल्ली ) १५-१,देवी दानिया ( मणिपूर )विजयी विरुद्ध अशुकुमारी (बिहार )१५-२, देवी हिरोईन (मणिपूर ) विजयी विरुद्ध श्रेया (सेनादल )१५-१०,सौम्या ( छत्तीसगड ) विजयी विरुद्ध सोनाली चौधरी (जम्मू काश्मीर ) १५-१,देवी रेणी (सेनादल )विजयी विरुद्ध नामचू नाग ( आसाम ) १५-३,संध्या केरोलीन (तामिळनाडू )विजयी विरुद्ध देवी प्रियाराणी (आसाम )१५-२ आणि भवानी (तामिळनाडू ) विजयी विरुद्ध रविना (हिमाचल प्रदेश )१५-२.