महावसुली गृहमंत्री, जुलमी महाविकास आघाडी सरकारने राजीनामा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:20 AM2021-03-24T04:20:40+5:302021-03-24T04:20:40+5:30
भ्रष्टाचाराचे आरोप झालेले गृहमंत्री अनिल देशमुख व जुलमी पद्धतीने वीजबिल वसुली करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ अकलूज शहर ...
भ्रष्टाचाराचे आरोप झालेले गृहमंत्री अनिल देशमुख व जुलमी पद्धतीने वीजबिल वसुली करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ अकलूज शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने गांधी चौकात आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली अकलूजचे उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले.
यावेळी सरपंच पायल मोरे, सदस्य धनंजय देशमुख, क्रांतिसिंह माने-पाटील, गणेश वसेकर, किशोर राऊत, लक्ष्मण आसबे, राहुल जगताप, सतीश व्होरा, लालासाहेब अडगळे, मुख्तार कोरबू, ॲड. वजीर शेख, रवी लव्हाळे, उत्कर्ष शेटे, हमिद मुलाणी, लक्ष्मण शिंदे, भोजराज माने, फिरोज शेख, संजय गोरवे, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी
सर्वसामान्य नागरिक व शेतकरी कोरोना आणि त्यानंतरच्या अतिवृष्टीने आर्थिक संकटात सापडले आहेत. या संकट काळात त्यांना दिलासा देणे गरजेचे असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकार सक्तीने वीजबिल वसुली व वीज तोडणी करून जनतेला वेठीस धरत आहे. जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे, घरगुती कनेक्शन वीज तोडणी व वीजबिल वसुली तत्काळ थांबवावी. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पत्रातून केलेला आरोप अत्यंत गंभीर, धक्कादायक व खळबळजनक आहेत. ही चौकशी निष्पक्ष होण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी करत शेतकऱ्यांच्या वीजबिलासाठी वीज तोडणी मोहीम जुलमी पद्धतीने राबविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत असल्याचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.