३३ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचे पॅनल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:24 AM2021-01-19T04:24:56+5:302021-01-19T04:24:56+5:30
यावेळी सोपल म्हणाले, बार्शी तालुक्यात आम्ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा पक्षांची मिळून एक मनाने महाविकास आघाडी आहे. ...
यावेळी सोपल म्हणाले, बार्शी तालुक्यात आम्ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा पक्षांची मिळून एक मनाने महाविकास आघाडी आहे. आमच्यात एकमत आहे. तालुक्यात बिनविरोध झालेल्या १६ पैकी खामगाव, मालवंडी, रातंजन, हळदुगे, सर्जापूर, शेलगाव (व्हळे),धामणगाव (आ), भोयरे ,खडकलगाव,
जामगाव (पा), झानपूर, पिंपळगाव (पा.), मुंगशी (आर),
पिंपळगाव (दे) या ग्रामपंचायतींमध्ये आमचे सदस्य बहुसंखेने निवडून आले आहेत.
बिनविरोध ग्रामपंचायती होतानाही या गावांमध्ये आमचे जास्त सदस्य असल्याने भविष्यात या ग्रामपंचायती आमच्याच ताब्यात राहतील.
सोमवारी निकाल लागलेल्या ७८ ग्रामपंचायतींपैकी भनसाळे, सासुरे, शेळगाव (आर), मळेगाव, गौडगाव, कळंबवाडी पा, गोरमाळे, तांदुळवाडी, यावली ,उपळाई ठोंगे ,श्रीपत पिंपरी, सौंदरे, निंबळक, पाथरी ,मानेगाव, पिंपळवाडी ,चारे, हिंगणी पा., आळजापूर ,धामणगाव (दु , गुळपोळी, पिंपरी आर, कव्हे, पिंपरी (पा ),दडशिंगे, तडवळे, बाभुळगाव, कासारी, महागाव, झरेगाव, तावडी, वालवड, कारी या ३३ ग्रामपंचायतीं मध्ये महा विकास आघाडीचे सदस्य बहुसंख्येने निवडून आल्यामुळे या ग्रामपंचायतींवर आमचीच सत्ता येणार आहे, असे सोपल म्हणाले.
----
लोकांचा संभ्रम होऊ नये म्हणून..
विरोधक ज्या ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक पातळीवर आघाड्या झाल्या त्यादेखील आपल्याच ताब्यात आल्याचे भासवत आहेत. असे स्पष्ट करीत सोपल यांनी बिनविरोध ग्रामपंचायती होताना आमचे सदस्य बहुसंख्येने घेतले गेले तरी गावातील सामंजस्य बिघडू नये यासाठी आम्ही बिनविरोध ग्रामपंचायतींवर हक्क सांगितला नव्हता, पण विरोधकांच्या विनाकारण श्रेय घेण्याच्या व गैरसमज पसरविण्याच्या विचारांना थारा मिळू नये व लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी बिनविरोध मधील वस्तुस्थिती आम्हाला सांगावी लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.