महाविकास आघाडीचा तुम्ही इथं कार्यक्रम करा; मी मुंबईत करेक्ट कार्यक्रम करतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:21 AM2021-04-13T04:21:29+5:302021-04-13T04:21:29+5:30

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर दुष्काळी, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची घोषणा केली होती. मात्र, वर्षभरानंतरही अनेक ...

Mahavikas Aghadi's program here; I do correct programs in Mumbai | महाविकास आघाडीचा तुम्ही इथं कार्यक्रम करा; मी मुंबईत करेक्ट कार्यक्रम करतो

महाविकास आघाडीचा तुम्ही इथं कार्यक्रम करा; मी मुंबईत करेक्ट कार्यक्रम करतो

Next

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर दुष्काळी, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची घोषणा केली होती. मात्र, वर्षभरानंतरही अनेक शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. शिवाय कर्जमाफी करताना यांनी अनेकदा आपले नियम, अटी बदलणे त्यामुळे कर्जमाफीपासून अनेक शेतकरी वंचित आहेत. रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दीड लाखाचे अनुदान जाहीर केले, ते कागदावर आहे. म्हणून हे आघाडी सरकार शेतकऱ्यांना काहीही न देता मुंबईतील बिल्डर, बार मालकांना विविध सवलती देऊन त्यांच्याकडून महिन्याला किमान १०० कोटी रुपये वसुलीसाठी धडपडत आहे, ही बाब निंदनीय आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना बेघर, उपाशी ठेवण्याचे पाप या सरकारने केले आहे.

देशातील इतर राज्य सरकारांनी लॉकडाऊन करण्याअगोदर मोठमोठी पॅकेज देऊन त्या त्या राज्यातील नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले. मात्र, या सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याने रोज नवीन नियम निघतात. जनतेला काहीही न देता जनतेकडूनच वीज वसुली व इतर कर आकारत स्वत:च्या पोळ्या भाजून घेणारे सरकार असल्याचे फडणवीस म्हणाले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी हा राज्यातील साखर कारखान्यांना अडचणीत आणणारा पक्ष व तेच साखर कारखाने पुन्हा स्वत:च्या मालकीचे करण्यासाठी धडपडणारा पक्ष असल्याची टीका केली. जिल्ह्यातील एक साखर कारखाना त्यांनी घेतलाच आहे. त्यामुळे तुमच्या विठ्ठलची अवस्था भविष्यात काय होणार आहे, हे मी सांगण्याची गरज नाही, असे सांगितले. मात्र, तो प्रकार आम्ही हाणून पाडू. शेतकऱ्यांचा राजवाडा असणारा विठ्ठल कारखाना शेतकऱ्यांचाच राहील यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रशांत परिचारक यांनी कै. सुधाकरपंत परिचारक यांनी अनेक अडचणीतील संस्था उर्जितावस्थेत आणण्याचा प्रयत्न केला. अनेक नवीन संस्था उभारल्या, वाढविल्या व चांगल्या पद्धतीने चालवून त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांना कसा होईल, याची धोरणे आखली. तरीही आम्ही त्यांचा वारसा कधीही सांगितला नाही. ज्यांच्यात कर्तृत्व व नेतृत्व करण्याची धमक असते, त्यांना वारसा सांगण्याची गरज नसते, असे म्हणत त्यांनी भगीरथ भालकेंवर निशाणा साधला. सध्याचे विरोधी उमेदवार हे संस्था मोडणाऱ्यांचा, लोकांच्या चुलीत पाणी ओतणाऱ्यांचा, खोटं बोलणाऱ्यांचा वारसा घेऊन मत मागण्यासाठी येत आहेत. मात्र, मतदार कोणत्याही भूलथापांना बळी न पडता मंगळवेढ्यापेक्षा पंढरपुरात समाधान आवताडे यांना सर्वाधिक मतं देतील. यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखविला. यावेळी राम शिंदे, चित्रा वाघ, लक्ष्मणराव ढोबळे, खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी सरकारवर तोफा डागल्या.

विठ्ठलचे ते १३ कामगार भाजपच्या व्यासपीठावर

विठ्ठलने कामगारांची, सभासदांची देणी दिली नाहीत म्हणून कामगारांकडून विठ्ठलच्या गेटवर कारखान्याच्या विराेधात आंदोलन सुरू होते. त्या सभासदांना त्यांची देणी देऊन दिलासा देण्याचे काम विठ्ठलच्या चेअरमन, संचालकांचे असतानाही त्यांनी दमदाटीची भाषा करत त्याच कामगारांना जेलमध्ये टाकण्याचे पाप केले होते. आज तेच १३ संचालक देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीरपणे भाजपच्या व्यासपीठावर उपस्थित राहिले व आम्ही पोटासाठी जेलमध्ये गेलो. आमचे हक्क हिरावणाऱ्यांना जागा दाखवा, असे म्हणत घोषणाबाजी केली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी न्याय देण्याची भूमिका घेतली जाईल, असे आश्वासन दिले.

फोटो लाईन :

पंढरपूर येथील जाहीर सभेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. व्यासपीठावर आ. प्रशांत परिचारक, माजी खा. विजयसिंह मोहिते पाटील, समाधान आवताडे आदी.

फोटो लाईन :

भाजपच्या व्यासपीठावर आलेले विठ्ठल कारखान्याचे ते १३ कामगार.

Web Title: Mahavikas Aghadi's program here; I do correct programs in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.