कुर्डूवाडी मिरवणूक टाळत घरीच साजरी केली महावीर जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:19 AM2021-04-26T04:19:21+5:302021-04-26T04:19:21+5:30

कुर्डूवाडी : कुर्डूवाडी नगरपालिकेच्या वतीने रविवारी भगवान महावीर यांच्या प्रतिमेस नगराध्यक्ष समीर मुलाणी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ...

Mahavir Jayanti was celebrated at home avoiding Kurduwadi procession | कुर्डूवाडी मिरवणूक टाळत घरीच साजरी केली महावीर जयंती

कुर्डूवाडी मिरवणूक टाळत घरीच साजरी केली महावीर जयंती

Next

कुर्डूवाडी : कुर्डूवाडी नगरपालिकेच्या वतीने रविवारी भगवान महावीर यांच्या प्रतिमेस नगराध्यक्ष समीर मुलाणी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, नगरसेवक अरुण काकडे , कार्यालयीन अधीक्षक अतुल शिंदे, लिपिक रवींद्र भांबुरे, सन्मती सेवा दलाचे अध्यक्ष संकेत दोशी, भारतीय जैन संघटना विभागीय उपाध्यक्ष राहुल धोका, महावीर देशमाने, विनायक भाळवणकर, नंदकुमार कदम, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष हमीद शिकलकर उपस्थित होते.

जैन बांधवाकडून शहरात मिठाई वाटप करण्यात आली. अनंतनाथ दिगंबर जैन मंदिर येथे उद्दोगपती सुहास शहा, अजित पंडित यांनी भगवान महावीर यांच्या प्रतिमेस अभिषेक करून पूजा केली. येथील श्वेतांबर जैन मंदिरात करण बलदोटा यांच्याहस्ते अभिषेक पूजा झाली. या दरम्यान, येथील स्वानंद सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा किरण सुराणा यांनी मनुष्य जन्म दुर्लभ आहे, कोरोना महामारीचे संकट आहे या विषयावर ऑनलाइन वकृत्व स्पर्धा आयोजित केली. शहरातील सकल जैन समाजाच्या वतीने कोरोना संकटामुळे प्रतिमेची मिरवणूक न काढता आपापल्या घरीच यंदाची जयंती साजरी केली.

.....

फोटो : २५ कुर्डूवाडी

कुर्डूवाडी नगरपालिकेच्या वतीने महावीर जयंती साजरी करताना, नगराध्यक्ष समीर मुलाणी, यावेळी चंद्रकांत वाघमारे, संकेत दोशी, अतुल शिंदे, हमीद शिकलकर.

Web Title: Mahavir Jayanti was celebrated at home avoiding Kurduwadi procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.