नागरिकांना पाण्याबाहेर काढणारा महेश ठरला जलदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:16 AM2020-12-07T04:16:03+5:302020-12-07T04:16:03+5:30
माळशिरस : उंबरे-दहिगाव (ता. माळशिरस) येथील नीराकाठच्या वस्तीला पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने नागरिक पाण्यात अडकले होते. स्वतःची नाव पुराच्या ...
माळशिरस : उंबरे-दहिगाव (ता. माळशिरस) येथील नीराकाठच्या वस्तीला पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने नागरिक पाण्यात अडकले होते. स्वतःची नाव पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने महेश कोळी याने चुलत्याची होडी घेऊन धाडसाने पाण्यात शिरला. त्या होडीच्या सहाय्याने १०० लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचविले. या कामाची दखल घेत आ. राम सातपुते व पंचायत समितीचे माजी सदस्य सोपान नारनवर यांनी महेश कोळी याची भेट घेऊन त्याला २१ हजार रुपयांची मदत देत शासन स्तरावर शौर्य पुरस्कारासाठी शिफारस करण्याचे आश्वासन दिले.
नीरा नदीत दररोज मासेमारी करून उपजीविका करणाऱ्या महेश कोळी यांनी नागरिकांच्या मदतीसाठी धाडसी पाऊल टाकले. यामुळे शासनाचे बचाव पथक पोहोचण्यापूर्वीच महेशने नागरिकांना सुखरूप बाहेर काढले होते.
कोट :::::::::::::::::::::::::::::::::
नोकरी नसल्यामुळे वडील करीत असलेल्या पारंपरिक मासेमारी व्यवसायात मदत करीत असल्यामुळे मला नाव चालवायचा अनुभव होता . यातच गावातील जवळच्या ठोंबरेवस्ती, इनामपट्टा, वस्तीला पाण्याने वेढा दिल्यामुळे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी माझे कर्तव्य म्हणून मी धाडस केले.
महेश कोळी
उंबरे-दहिगाव
फोटो ::::::::::::::::::::::::::::::::
जलदूत महेश कोळी या तरुणाला मदत देऊन कौतुक करताना आ. राम सातपुते व माजी झेडपी सदस्य सोपान नारनवर.