मेथवडे ग्रामपंचायतीवर महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:10 AM2021-01-08T05:10:01+5:302021-01-08T05:10:01+5:30
मेथवडे (ता. सांगोला) येथील ग्रामपंचायतीच्या नऊ जागेसाठी १८ अर्ज दाखल केले होते. दरम्यान, मेथवडे ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी तरुणांच्या पुढाकाराने ...
मेथवडे (ता. सांगोला) येथील ग्रामपंचायतीच्या नऊ जागेसाठी १८ अर्ज दाखल केले होते. दरम्यान, मेथवडे ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी तरुणांच्या पुढाकाराने तालुक्याचे आजी-माजी लोकप्रतिनिधीच्या मार्गदर्शनाखाली व बाजार समितीचे सभापती गिरीश गंगथडे, झेडपी सदस्य अतुल पवार व माजी सरपंच जगदीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीत गावच्या विकासाच्या दृष्टीने पुढील पाच वर्षांसाठी ग्रामपंचायतीचा कारभार महिलांच्या हाती सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी शेवटच्या दिवशी नऊ उमेदवारांनी माघारी घेतल्याने ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात नेतेमंडळींना यश आले आहे.
बिनविरोध सदस्य
प्रभाग क्र. १ : राणी रमेश पवार, नलिनी श्रीमंत लेंडवे, सुरेखा नवनाथ पवार, प्रभाग क्र. २ : सविता विलास माळी, संगीता परमेश्वर पवार, आशा कल्याण जाधव, प्रभाग क्र. ३ : पूनम सीताराम शेळके, ज्योती कृष्णा कांबळे, अलका अण्णासो माळी.
फोटो ओळ ::::::::::::::::::::::::
मेथवडे (ता. सांगोला) ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यानंतर जल्लोष करताना नवनिर्वाचित महिला सदस्य व अन्य.