महेमूद शेख यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:21 AM2021-04-24T04:21:34+5:302021-04-24T04:21:34+5:30
सोलापूर : सोशल उर्दू हायस्कूलचे सेवानिवृत मुख्याध्यापक, थोर तपस्वी, राज्यस्तरावरील सोलापुरातील पहिले उर्दू आदर्श शिक्षक, सोशल असोसिएशनचे ट्रस्टी, हाजी ...
सोलापूर : सोशल उर्दू हायस्कूलचे सेवानिवृत मुख्याध्यापक, थोर तपस्वी, राज्यस्तरावरील सोलापुरातील पहिले उर्दू आदर्श शिक्षक, सोशल असोसिएशनचे ट्रस्टी, हाजी महेमूद शेख (८८) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगी, तीन मुले, नातवंडे असा परिवार आहे. महेमूद हे एक शिस्तप्रिय मुख्याध्यापक होते. ते उर्दू, इंग्रजी, गणिताचे तज्ज्ञ शिक्षक म्हणून अनेक व्याख्यानांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर विद्यार्थांना मार्गदर्शन केले. ज़ौके-नजर हे त्यांचे पुस्तक महाराष्ट्रभर गाजले. महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य परिषद, उर्दू अदबी कॉन्फरन्सकडून ही त्यांना उर्दू सेवेबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
भीमराव जाधव
सोलापूर : तबला वादक भीमराव केरु जाधव (८०) यांचे निधन झाले. ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत सामाजिक कार्यात सहभागी असणारे भीमसैनिक कै. केरू रामचंद्र जाधव यांचे थोरले पुत्र होत. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, सुना, चार मुली, नातवंडे असा परिवार आहे.
श्यामराव कुलकर्णी
सोलापूर : ज्येष्ठ तबलावादक पंडित श्यामराव कुलकर्णी (६६, रा.आदित्य नगर, विजापूर रोड) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे.