ऑक्स‍िजनचा पुरवठा सुरळीत ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:21 AM2021-04-24T04:21:47+5:302021-04-24T04:21:47+5:30

पंढरपूर : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधितांना तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयांत डेडिकेटेड ...

Maintain oxygen supply | ऑक्स‍िजनचा पुरवठा सुरळीत ठेवा

ऑक्स‍िजनचा पुरवठा सुरळीत ठेवा

Next

पंढरपूर : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधितांना तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयांत डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल व डेडिकेटेड कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. या रुग्णालयांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी वितरकांनी पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिल्या.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून करावयाच्या उपाययोजनांबाबत शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे बैठक पार पडली. या बैठकीस उपजिल्हाधिकारी सचिन ढोले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम, आयएमएचे डॉ. पंकज गायकवाड आणि ऑक्सिजन वितरक उपस्थित होते.

जाधव म्हणाले, ऑक्सिजन पुरवठाधारकांनी ऑक्सिजन पुरवताना प्राधान्याने रुग्णालयांना पुरविण्यात यावा. अनावश्यक वापर व गळती होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर बेड आणि ऑक्सिजन तसेच औषधे वेळेवर उपलब्ध होतील, याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी. रेमडेसिविर इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण असून, त्याचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी, त्यासाठी संबंधितांनी वेळोवेळी तपासणी करावी, अशा सूचनाही जाधव यांनी यावेळी दिल्या.

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने वेदांत व व्हिडिओकॉन भक्तनिवासामध्ये २०० बेड प्रशासनास मोफत उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी एकनाथ बोधले व वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम यांनी कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी करण्यात आलेल्या तसेच आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

शाळा, मठ ताब्यात घ्या

तालुक्यातील शहरांमधील तसेच ग्रामीण भागातील विविध शाळा, मठ ताब्यात घेऊन कोविड केअर सेंटर उभारणीसाठी कार्यवाही करावी. कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता भविष्यातील नियोजनासाठी आरोग्य यंत्रणेने पेड कोविड सेंटरच्या प्रस्तावाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक निर्णय घ्यावा. खासगी रुग्णालयांनी कोविड केअर सेंटर निर्मितीसाठी दिलेल्या रुग्णालयांची आवश्यक तपासणी करून प्रस्ताव सादर करावेत, असे उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

Web Title: Maintain oxygen supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.