मैत्रेने घातला चार हजार लोकांना गंडा, आर्थिक गुन्हे शाखेची माहिती, दोघांना अटक , कागदपत्रे व संगणक जप्त
By admin | Published: June 7, 2017 02:41 PM2017-06-07T14:41:25+5:302017-06-07T14:41:25+5:30
-
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ७ : गुंतवणुकीच्या नावाखाली हजारो ठेवीदारांकडून लाखो रुपए गोळा करुन ठेवी परत करण्यास टाळाटाळ करणाऱ्या मैत्रेय कंपनीच्या चेअरमनसह पाचजणांविरुध्द सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी युवराज साखरे, कृ ष्णहरी अंबाजी सामलेटी (रा. सोलापूर) या दोघांना अटक केली आहे. तर मैत्रेने जिल्ह्यात चार हजार लोकांची फसवणुक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
शहरातील मैत्रेय प्लॉटर्स अण्ड स्ट्रक्चरर्स प्रा. लि़ या कंपनीत नागरिकांनी ७ ते ८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. जानेवारी २०१६ पासून या कंपनीचे कार्यालय बंद करण्यात आले.आर्थिक गुन्हे शाखेने ह्यमैत्रेयह्णचेअरमन व संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली.गुन्ह्या चा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे करत आहेत. राज्यात हजारो गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या मैत्रेयने अवघ्या एका वर्षात बाजारात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. मैत्रेयने ग्राहकांकडून अब्जावधी रुपये उकळले; मात्र गुंतवणूकदारांना कोरड्या आश्वासनापलीकडे काहीही दिले नाही. दुसरीकडे या गुंतवणूकदारांच्या रकमेतून मैत्रेयच्या संचालकांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून लाखो रुपयांची माया गोळा केली.
------------------
तक्रारीचा आकडा वाढला
मैत्रेय प्लॉटर्स अॅण्ड स्ट्रक्चर्स प्रा. लि. ने सोलापुरातील नागरिकांना चालू ठेव, मुदत ठेव, सुवर्णसिद्धी अशा तीन प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास लावून त्यांना जास्त लाभाचे अमिष दाखवले. आर्थिक गुन्हे शाखेकडे बुधवारी १०० जणांनी मैत्रेये विरुध्द तक्रारी दाखल केल्या आहेत. यात ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांचा समावेश आहे. मैत्रे कंपनीत १० हजार नागरिकांनी गुतवणुक केली होती. त्यातील ६ हजार लोकांना मैत्रेने त्यांचे पैसे परत केले. चार हजार लोकांना अद्याप पैसे परत मिळाले नाहीत.
----------------------
संगणक कागदपत्रे जप्त
आर्थिक गुन्हे शाखेने सोलापूरातील मैत्रेच्या कार्यालयास सिल ठोकुन काही कागदपत्रे व संगणक जप्त केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी दिली. दरम्यान अन्य आरोपींना ही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
--------------------------
आर्थिक गुन्हे शाखेचे ठेवीदारांना आवाहन
ज्या ठेवीदारांनी ठेव स्वरूपात मैत्रेय कंपनीत रकमेची गुंतवणूक केलेली आहे व त्यांना कंपनीकडून परतावा मिळालेला नसेल, त्या ठेवीदारांनी मूळ कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.