सोलापूरजवळ मोठा अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

By Appasaheb.patil | Published: March 21, 2023 12:20 PM2023-03-21T12:20:46+5:302023-03-21T12:21:15+5:30

या अपघातात तिघे जण ठार तर अन्य दोन ते तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

major accident near solapur three died on the spot | सोलापूरजवळ मोठा अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

सोलापूरजवळ मोठा अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

googlenewsNext

आप्पासाहेब पाटील, सोलापूर :सोलापूर-तुळजापूर रोडवरील तामलवाडी हद्दीत असलेल्या कटारे स्पीनिंग मिलजवळ मंगळवारी पहाटेच्या सुमारास मोठा अपघात झाला. या अपघातात तिघे जण ठार तर अन्य दोन ते तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, अपघातात ठार झालेले तिघे हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील चास गावातील रहिवाशी असल्याचे सांगण्यात आले. या अपघातानंतर तामलवाडी पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. अपघात झाल्यानंतर लोकांनी जीपमधील जखमींना सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मृत असलेल्या तिघांचे शवविच्छेदनाचे काम सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातात मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. तामलवाडी पोलिस ठाण्याचे पथक सोलापुरातील शासकीय रूग्णालयात दाखल झाले आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून अधिक तपास तामलवाडी पोलिस करीत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: major accident near solapur three died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.