संकटकाळात एक कॉल करा, गाव मदतीला येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:22 AM2021-09-25T04:22:42+5:302021-09-25T04:22:42+5:30

सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी खेड येथे उत्तर तालुक्यातील सरपंच उपसरपंच ...

Make a call in times of crisis, the village will come to the rescue | संकटकाळात एक कॉल करा, गाव मदतीला येईल

संकटकाळात एक कॉल करा, गाव मदतीला येईल

Next

सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी खेड येथे उत्तर तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांची ग्राम सुरक्षा यंत्रणेसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. गोरडे पुढे म्हणाले की, चोरी, दरोडेखोरी, अपघात यांसारख्या घटनेत वेळेवर मदत न मिळणे. ही मोठी समस्या असते. ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या नंबरवर नोंदणी केलेल्या नागरिकाने फोन केल्यास परिसरातील हजारो नागरिकांना हा कॉल जातो व घटना घडत असतानाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते. यावेळी सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण घुगे, उत्तर तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.

...............

फोटो ओळी : उत्तर सोलापूर ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या बैठकीप्रसंगी संचालक डी.के. गोरडे, पोलीस निरीक्षक अरुण घुगे, बीडीओ प्रवीण देशमुख आदी.

...........

फोटो २४मार्डी

Web Title: Make a call in times of crisis, the village will come to the rescue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.