कोरोना लसीकरण मोहीम प्रभावी करा : पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:29 AM2021-02-27T04:29:43+5:302021-02-27T04:29:43+5:30

मंगळवेढा तालुक्यातील कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत ...

Make Corona Vaccination Campaign Effective: Guardian Minister | कोरोना लसीकरण मोहीम प्रभावी करा : पालकमंत्री

कोरोना लसीकरण मोहीम प्रभावी करा : पालकमंत्री

Next

मंगळवेढा तालुक्यातील कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीला नगराध्यक्ष अरुणा माळी, पंचायत समिती सभापती प्रेरणा मासाळ, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्निल रावडे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे, मुख्याधिकारी निशीकांत परचंडराव आदी उपस्थित होते.

मंगळवेढा मोठा तालुका आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होणार नाही, यासाठी महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागाने एकत्रित प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी टेस्टींग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करावा. आरोग्य यंत्रणा प्रभावी करण्याबरोबरच स्थानिक खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचीही मदत घेण्यात यावी. उपचार वेळेत होण्याबरोबरच आरोग्य यंत्रणा, महसूल यंत्रणा आणि पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे. लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री भरणे यांनी दिल्या. यावेळी भगिरथ भालके यांनीही विविध सूचना मांडल्या.

उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी नंदकुमार शिंदे, गटविकास अधिकारी चव्हाण यांनी त्यांच्या विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली.

Web Title: Make Corona Vaccination Campaign Effective: Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.