अवकाळी पावसातील नुकसानीचे पंचनामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:21 AM2021-04-15T04:21:05+5:302021-04-15T04:21:05+5:30
मोडनिंब : जिल्ह्यात १२ आणि १३ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वा-यामुळे माढा मतदारसंघात समाविष्ट माढा, ...
मोडनिंब : जिल्ह्यात १२ आणि १३ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वा-यामुळे माढा मतदारसंघात समाविष्ट माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्यांतील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीत पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याबाबत आमदार बबनराव शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी केली आहे.
माढा विधानसभा मतदारसंघामध्ये १२ आणि १३ एप्रिल रोजी अनेक ठिकाणी वादळी वा-यासह अवकाळी पाऊस झाला. हजारो एकर द्राक्ष, ऊस, केळीच्या बागा, डाळिंब, पपई व फळबागा भुईसपाट झाल्या. शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच गहू, हरभरा, कांदा यासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच त्यांची जनावरे दगावली आहेत. त्यामुळे शेतक-यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यांच्यापुढे मोठे आर्थिक संकट उभारले आहे. मागील दीड वर्षापासून कोरोनाच्या संकटात अवकाळी पावसाने भर घालून बळीराजाला आणखीनच अडचणीत आणले आहे. आता आसमानी संकटामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून त्यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
याप्रसंगी आमदार संजयमामा शिंदे, कल्याणराव काळे, रणजितसिंह शिंदे, राहुल पूर्वत, अभिषेक पुरवत, आदिनाथ देशमुख, राहुल शिंगटे, अभिजित कवडे, भारत गवळी, पांडुरंग नगरकर, शरद पांढरे यांच्यासह विविध गावांतील नागरिक उपस्थित होते.
---
१४ मोडनिंब
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अवकाळीत सापडलेल्या पिकांच्या पंचनाम्याची मागणी करताना आमदार बबनराव शिंदे, कल्याणराव काळे, रणजितसिंह शिंदे.