प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करा : समाधान होटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:20 AM2021-05-22T04:20:39+5:302021-05-22T04:20:39+5:30
बऱ्हाणपूर : सोलापूर जिल्हा सध्या कोरोनाशी लढत आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा, वाढता मृत्युदर, उजनीचे पाणी, व्यापाऱ्यांमधील असंतोष ...
बऱ्हाणपूर : सोलापूर जिल्हा सध्या कोरोनाशी लढत आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा, वाढता मृत्युदर, उजनीचे पाणी, व्यापाऱ्यांमधील असंतोष अशा विविध विषयांवर पालकमंत्री अपयशी ठरत आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस समाधान होटकर यांनी केली आहे.
वरील विविध विषय हाताळण्यास स्थानिक सक्षम नेतृत्वाची गरज आहे. विद्यमान पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याबद्दल सर्व पक्षातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. उजनीतील सोलापूरच्या हक्काचे पाच टीएमसी पाणी इंदापूरसाठी मंजूर करून घेतल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी नाराज आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री केल्यास जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. पालकमंत्री पदामुळे काँग्रेस पक्षाला जिल्हास्तरावर पक्ष वाढण्यास मदत होणार आहे. आमदार प्रणिती शिंदे या स्वत:च्या मतदारसंघात योग्य पद्धतीने प्रशासनाला सोबत घेऊन प्रश्न हाताळत आहेत. त्यामुळे त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री करावे, अशी मागणी केल्याचे होटकर यांनी सांगितले. (वा. प्र.)
---
फोटो : २१ समाधान होटकर.